आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amma Salt News In Marathi, Tamilnadu, JAYALALITHA

गोरगरिबांसाठी तामिळनाडूत ‘अम्मा मीठ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- अम्मा इडली, अम्मा मिनरल वॉटरनंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी गोरगरिबांसाठी आणखी एक योजना लागू केली आहे ती स्वस्तात मीठ पुरवण्याची. त्याला नावही ‘अम्मा मीठ’ असे दिले आहे. बुधवारी तामिळनाडूच्या सचिवालयात जयललितांनी या योजनेचा शुभारंभ केला. अम्मा मिठाचे तीन प्रकार असून त्यात डबल फोर्टिफाइड, लो सोडियम आणि रिफाइंड फ्री फ्लो आयोडिनयुक्त मिठाचा समावेश आहे. खुल्या बाजारात खासगी उत्पादकांच्या मिठाच्या किमती अनुक्रमे 25, 21 आणि 14 रुपये किलो आहेत. अम्मा मिठांच्या किमती अनुक्रमे 21, 14 आणि 10 रुपये किलो असतील.