आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुजूरसाहिबला नियुक्तीचा अधिकार, नांदेड तख्तच्या मुद्द्यावर अमरिंदर यांची बादल यांच्यावर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल वैयक्तिक हितासाठी शीख समाजातील अनेक संवेदनशील मुद्द्याचा वापर करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अमरिंदरसिंग यांनी सोमवारी केला. वैयक्तिक हितसंबंधासाठी या समाजाचा वापर करणे हे बादल यांचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून नांदेडच्या हुजूरसाहिब तख्ताच्या अध्यक्षपदी भाजप आमदाराची नियुक्ती केल्याबद्दल बादल यांनी विरोध केला होता. राज्य सरकारचा निर्णय शीख धर्मसंहितेच्या विरुद्ध असल्याची भूमिका बादल यांनी घेतली होती.

याच मुद्द्यावर मुख्यमंत्री बादल यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्र सरकारचा निर्णय म्हणजे शीख धर्मसंहितेच्या मर्यादेचे उल्लंघन असल्याचे नमूद केले होते. बादल यांच्या दृष्टीने या धर्माची तत्त्वे पाळणारा शीख ठरत नसल्याचा आरोप अमरिंदरसिंग यांनी केला आहे. एखादा शीख काँग्रेस, भाजप किंवा अन्य पक्षात असेल तर बादल यांच्यासाठी तो शीख नसतो. बादल यांनी पंथ रतन (एसजीपीसीचे माजी प्रमुख दिवंगत गुरुचरणसिंग तोहरा), अकाली नेते जगदेवसिंग तलवंडी यांना विश्वासघातकी ठरवले होते. पंजाबमध्ये आता बादल यांना अनुकूल परिस्थिती राहिलेली नाही.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे त्यांच्याकडून आता समाजाचा वापर केला जात आहे. हुजूरसाहिब ही स्वतंत्र व्यवस्थापन संस्था असून त्यांना कोणाचीही नियुक्ती करण्याचा अधिकार असतानाही बादल विनाकारण यात हस्त्क्षेपकरत असल्याचे अमरिंदर यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.