आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसरच्या दरबार साहिबचा परिसर चकाचक दिसणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार पंजाब, हरियाणा आणि हिमाचलची काही निवडक पर्यटन केंद्रे आणि धार्मिक स्थळांशी संबंधित ठिकाणांची स्वच्छता करून जागतिक ओळख देणार आहे. त्यासाठी सरकार ६ ठिकाणांची निवडही करणार आहे. यामध्ये अमृतसरच्या दरबार साहिब आणि जालियनवाला बागेचा समावेश आहे. हरियाणाच्या हिसार येथील फिरोजशाह पॅलेस आणि तहखान व हिमाचलच्या सिमलातील माल रोड, डलहौसी, खजियार व चंबाच्या प्रसिद्ध ग्रुप ऑफ टेम्पल्सचा समावेश आहे. या धार्मिक स्थळांचा स्वच्छ भारत अभियानात समावेश आहे. स्थानिक प्रशासनासोबत केंद्र सरकार या योजनेवर काम करणार आहे. यामध्ये नागरिक व खासगी संस्थांची मदत घेतली जाईल.

विदेशी पर्यटकांसमोर आदर्श घालून देणार
परदेशांमध्ये पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. या अनुषंगाने स्वच्छता प्रकल्पावर काम केले जाणार आहे. या ठिकाणांवरील स्वच्छतेचा स्तर युरोप आणि पश्चिमात्य देशांसारखा असेल. विदेशी पर्यटकांसमोर स्वच्छतेचे उदाहरण म्हणून ते सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रमुख ठिकाणांवर दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भेट देतात. यामुळे स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगात सहज पोहोचवता येऊ शकतो.

योजनेसाठी स्वतंत्र निधी नाही
केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात आला नाही. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील समभागधारकांना यामध्ये सहभागी केले आहे. खासगी समभागधारकांचे उद्योजक त्याकडे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पाहतील.
यशाचा फॉर्म्युला असा
देशातील सामाजिक व धार्मिक संपदेच्या जागी स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सरकारने एक विशेष फॉर्म्युला तयार केला आहे. पर्यटन मंत्रालयानुसार, शिक्षण, प्रशिक्षण व प्रदर्शनाच्या संयुक्त प्रयत्नात संबंधित ठिकाणांची स्वच्छता जागतिक दर्जाची केली जाईल. मंत्रालय, खासगी संस्था आणि लोकांना प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...