आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदरसे बनले समलैंगिकांचे अड्डे, मुस्लिम प्राध्यापकाचा गौप्यस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिगड- उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) एका प्राध्यापकाच्या 'वॉट्सअॅप'वरील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मदरसे हे समलैंगिकांचे (गे) अड्डे बनल्याचा गौप्यस्फोट विद्यापीठाचे इतिहासाचे प्रा. वसीम रजा यांनी केला आहे. अशी मदरसे बंद करायला हवीत, अशी मागणीही प्रा. वसीम रजा यांनी केली आहे.

मदरशांसंदर्भातील आपली टिप्पणी प्रा.रजा यांनी एका वृत्तवाहिणीलाही पाठवले आहे. त्यानंतर मात्र, अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानी कथित मुद्द्यावरून प्रा. रजा यांच्याविरुद्ध मोर्च उघडला आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर उरतले आहेत.

प्रा. रजा यांचे 'वॉट्सअॅप'
'मदरशांमध्ये विद्यार्थी आणि मौलानांच्या समलैंगिकतेचा बोलबाला आहे. मुस्लिम तरुणांचे भविष्य खरंच सुधारायचे असेल तर देशातील मदरशांवर बंदी घालण्याची गरज आहे.'

टिप्पणीनंतर प्रा.रजा यांचा युटर्न
मागील 30 वर्षांपासून विद्यापीठात ज्ञानदानाचे काम करणारे प्रा.रजा यांनी टिप्पणीनंतर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता 'युटर्न' घेतला आहे. मदरशांसंदर्भात कोणतीही टिप्पणी आपण केली नसल्याचे प्रा. रजा यांनी म्हटले आहे. सार्क परिषदेत मी सहभागी झालो होतो. तेथे मुस्लिम समुदायाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. मदरसे मुस्लिम समुदायाचा भाग नाहीत का? असा प्रती सवाल प्रा. रजा यांनी केला आहे. माझा फोन हॅक झाला होता. मी 'वॉट्सअॅप' ग्रुप ब्लॉक केला आहे.
एएमयूच्या प्राध्यापकांच्या प्रतिकिया
प्रा. रजा यांच्या टिप्पणीमुळे अ‍लिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रा.रजा यांनी विद्यापीठाविषयी विचारपूर्वक वक्तव्य करायला हवे होते. प्रा. रजासारखे लोक मुस्लिम समुदायाची बदनामी करत आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू सध्या भारताबाहेर आहेत. ते परत आल्यानंतर या प्रकरणी निर्णय घेतला जाईल, असे सचिव मुस्तफा झैदी यांनी सांगितले आहे.