आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅम्ब्यूलन्स येण्यास ६ तास उशिर झाल्याने अलिगड विद्यापीठाच्या प्राध्यपकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिगड विद्यापीठाचे प्राध्यापक मूर्ती यांचे मंगळवारी निधन झाले. - Divya Marathi
अलिगड विद्यापीठाचे प्राध्यापक मूर्ती यांचे मंगळवारी निधन झाले.
अलिगड - कॉल केल्यानंतर अॅम्ब्युलन्स येणार, अशा जाहिराती झळकत असल्यातरी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील एका वरिष्ठ प्राध्यापकांचा अॅम्ब्युलन्स वेळेवर न पोहोचल्यामुळे मृत्यू झाला आहे. एक नाही, दोन नाही तब्बल सहा तास उशिरा अॅम्ब्युलन्स आली होती. ही घटना मंगळवारी घडली. प्राध्यापकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दिल्लीला शिफ्ट करायचे होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गदारोळ घातला. विद्यापीठ प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नियुक्त करुन या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. समिती ५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करणार आहे.
- तामिळनाडुमधील वेल्लोर जिल्ह्यातील प्राध्यापक डी मूर्ती (६४) विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ मॉडर्न इंडियन लँग्वेजचे विभागप्रमुख होते.
- प्रा. मूर्ती हे कँसरने पीडित होते. रविवारी एका सर्जरीनंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर कॅम्पसमधील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला शिफ्ट करण्याचा सल्ला दिला होता.
- अधिकाऱ्यांचा आरोप आहे की कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे वेळेवर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था होऊ शकली नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
- प्राध्यापक मूर्ती यांच्यावर विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...