आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An Aadhar Card For Lord Hanuman Delivered In Rajasthan

भगवान हनुमानांचे आधार कार्ड काढणारा ऑपरेटर काळ्या यादीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - भगवान हनुमान यांच्या छायाचित्रासह आधार कार्ड तयार करणार्‍या ऑपरेटरला प्रशासनाने काळ्या यादीत टाकले आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

शुक्रवारी या प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर आधार कार्ड तयार करणार्‍या एजन्सीच्या कर्मचा र्‍याचा बेजबाबदारपणाच यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. चुरूमध्ये हे कार्ड तयार करण्यात आले होते. हे वृत्त दैनिक भास्करच्या देशभरातील आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ओळखपत्र प्राधिकरणाने चौकशी समिती नेमली.

प्राधिकरणाच्या राजस्थान शाखेचे संचालक डॉ. हंसराज यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार ही चौकशी पुढील आठवड्यात पूर्ण होईल. भगवान हनुमानाच्या नावे तयार झालेले हे आधार कार्ड बंगळुरूच्या पत्त्यावर परत पाठवण्यात आल्याचे टपाल खात्याच्या सूत्रांनी सांगितले.