आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An American Tourist In Manali Says She Has Been Gang raped

अमेरिकन पर्यटक महिलेवर मनालीत सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाली - एका अमेरिकन पर्यटक महिलेने आरोप केला आहे की, मंगळवारी पहाटे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, अमेरिकन महिला (३१) पहाटे मुख्य रस्त्यावर पब्लिक ट्रांसपोर्टची वाट पाहात उभी होती. त्यावेळी तेथून जाणा-या एका ट्रकमधील तीन जणांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ट्रकमध्ये बसवून घेतले, आणि त्यांनी तिला जवळच्या जंगलात नेऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार केले.
त्यानंतर पीडित अमेरिकन महिलेने पोलिस स्टेशन गाठून त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.