आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An Indian Lead American Navy, Last 16 Years Responsibility Of Stratgic

अमेरिकेच्या नौदलाची मदार भारतीयांवर, गेल्या 16 वर्षांपासून सामरिकविषयाची जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिलाई - छत्तीसगडमध्ये लहानाचे मोठे झालेले डॉ. वसंत जोशी यांचे अमेरिकेच्या नौदलात मोठे योगदान आहे. गेल्या 16 वर्षांपासून त्यांच्या संशोधनावर अमेरिकेची सामरिक मदार आहे. ‘रिअ‍ॅक्टिव्ह मटेरियल’ हे जोशी यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आहे. अमेरिकेच्या नौदलात त्याचा वापर करण्यात येत आहे. गेल्या 16 वर्षांपासून त्यांच्या संशोधनाचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ पाण्यामध्येदेखील जळतो. त्याचा वापर नेमका कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने केला जातो, याची माहिती देण्यास मात्र जोशी यांनी गोपनीयतेचा हवाला देऊन टाळले. 16 वर्षांपासून संशोधन विभागात काम करणा-या जोशी यांचे संशोधन सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. डॉ. जोशी वॉशिंग्टनमधील 12 सदस्यीय टीमचे नेतृत्व करतात. ही टीम मुख्यत: रिअ‍ॅक्टिव्ह मटेरियलवर सातत्याने संशोधन करते.
कानपूरमध्ये अभियांत्रिकी
जोशी यांचे शालेय शिक्षण बीएसपी इंग्लिश प्रायमरी स्कूल सेक्टर-9 मध्ये झाले. आयआयटी कानपूरमध्ये त्यांनी 1979 मध्ये मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत 1996 मध्ये मेटलर्जिकल विषयात पीएचडी पूर्ण केली. त्या काळात त्यांना प्रतिष्ठेचा लांगमियर पुरस्कारदेखील मिळाला होता. पदार्थ उच्च तापमानात कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो, याचे ते तज्ज्ञ मानले जातात.
ही आहे मटेरियल रिअ‍ॅक्शन
वरिष्ठ संशोधक डॉ. प्रताप बी. देशमुख म्हणाले, मटेरियल रिअ‍ॅक्शनवर अमेरिकेत सध्या सर्वाधिक संशोधन सुरू आहे. त्यात दोन किंवा अधिक पदार्थांचा संयोग असतो. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि लेझरसारख्या उत्प्रेरकांच्या प्रभावाखाली येऊन ज्वलनशील होण्याची त्यात क्षमता असते. डॉ. वसंत जोशी त्यादृष्टीने उल्लेखनीय संशोधनाचे काम करत आहेत.