आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद; प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 2 रेंजर्स ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये शुक्रवारी पाकिस्तानी जवानांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक जवानांनी सलग तिसऱ्या दिवशी हा गोळीबार केला. दरम्यान, भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात दोन पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले.
 
संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानुसार, पाकिस्तानने पहाटे जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला. यादरम्यान चौकीवर तैनात कॉन्स्टेबल बिजेंद्र बहादूर यांच्या पोटात गाेळी लागली. रुग्णालयात नेले जात असताना त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. बिजेंद्र उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी होते. दरम्यान, या गोळीबारात भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे दोन रेंजर्स मारले गेले. गुरुवारी रात्रीपासूनच सीमेवरील या भागात गोळीबार सुरू होता आणि उखळी तोफगोळ्यांचा माराही सुरू होता. शुक्रवारी सकाळपर्यंत हा गोळीबार सुरू होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या नुकत्याच केलेेल्या जम्मू दौऱ्यात पाकिस्तानने २०१४पासून दरवर्षी ४००हून अधिक वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले हाेते.
बातम्या आणखी आहेत...