आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात बुडाले लक्षद्वीपचे एक बेट, आता उरले नाही 36 बेंटांचा समूह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोच्चि - बेटांचा समूह असलेल्या लक्षद्वीपचे कित्येक निर्जन बेटांवर समुद्रात समाधी जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. असेच एक छोटेसे बेट वाढत्या पाण्यामुळे पूर्णपणे गायब झाले आहे. याच बेटाच्या शेजारील 4 बेटांची हीच अवस्था होणार अशी परिस्थिती बनली आहे. ही माहिती नुकतेच केलेल्या एका संशोधनातून पुढे आली आहे. आर.एम हिदायतुल्ला यांनी आपल्या संशोधनात सांगितल्याप्रमाणे, बंगाराम एटोलचा भाग राहिलेला पराली-1 बेट पूर्णपणे गायब झाला. 1968 मध्ये हा बेट 0.032 चौरस किमी पसरला होता. लक्षद्वीपच्या अन्दरोत येथे राहणारे हिदायतुल्ला यांना याच वर्षी जुलै महिन्यात कालीकट विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली. 
 
 
- त्यांनी आपल्या संशोधनात लक्षद्वीपचे पाच निर्जन बेट बंगाराम, तिन्नाकारा, पराली-1, पराली-2 आणि पराली-3 यांचा अभ्यास केला आहे. त्यापैकी पराली-1 समुद्रात लीन झाले आहे. केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप 36 बेटांचा समूह म्हणूनही ओळखल्या जातो. मात्र, या प्रदेशाचे बेट आता लोप पावत आहेत. 
- हिदायतुल्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, पुढे आलेल्या निष्कर्शांवरून स्पष्ट झाले आहे, की एटोलच्या दुसऱ्या बेटांबद्दल सुद्धा लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या व्यतीरिक्त मँग्रोवचा उपयोग बेटांच्या जैविक विविधतेवर विपरीत परिणाम करत आहे. 
- हिदायतुल्ला यांचे गाइड सीसी हरिलाल यांनी सांगितल्याप्रमाणे, 'पराली-1 बेटाला जलसमाधी मिळाली त्यावेळी मी त्याचा अभ्यास केला होता. 2011 मध्ये बंगाराम एटोलच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी हे बेट पूर्णपणे बुडाले होते. बेट समुद्रात लीन झाल्यामुळे आता लक्षद्वीपला 36 बेटांचा समूह म्हणता येणार नाही.'
बातम्या आणखी आहेत...