आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP तील विजयाचा फॉर्म्युला : 28% पेक्षा अधिक मते मिळवणारा पक्षच स्थापन करतो सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात 2007 पासून एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्यास सुरुवात झाली आहे. युपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी 404 पैकी 202 जागांची गरज आहे. गेल्या निवडणुकीचे विश्लेषण करता 28% टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवणाऱ्या पक्षाची सत्ता स्थापन होते. विशेष म्हणजे, यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे सर्व पक्ष 300 हून अधिक जागा मिळवण्याचा जदावा करत आहेत. 

28% पेक्षा अधिक मते मिळाल्यानंतर मिळाली सत्ता 
- 2012 च्या निवडणुकीत सपाला 29% मते मिळाली होती. त्याजोरावर पक्षाने 226 जागा मिळवत एकहाती सत्ता स्तापन केली होती. या निवडणुकीत बसपला 26% मते मिलाली होती. त्यांना 80 जागांवर विजय मिळवता आला होता. 
- 2007 च्या निवडणुकीत बसपला 30.43% टक्के मते मिळाली होती. 206 जागा जिंकत त्यावेळी मायावतींचे सरकार स्थापन झाले होते. तर याच निवडणुकी 97 जागा मिळवणाऱ्या सपाला 25.4% टक्के मते मिळाली होती. 

2014 मधीत बाजपती मतांची टक्केवारी 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 43.60% टक्के मते मिळाली. त्या जोरावर भाजपने लोकसभेच्या 80 पैकी 71 जागांवर विजय मिळवला. 
- या निकालांचे विश्लेषण केल्याच लक्षात येते की, सध्याच्या विधानसभेच्या 328 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. 

किती नुकसान सहन करू शकते भाजप?
- 28% मते मिळाल्यास उत्तर प्रदेशात सत्ता मिळू शकते. त्यानुसार 2014 च्या लकसभा निवडणुकीत 43% मते मिळवणाऱ्या बाजपला 10-12% टक्क्यांपर्यंत नुकसान चालू शकते. त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास स्पर्धेत राहणे कठीण ठरेल. 

15% टक्के मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता कमी 
गेल्या वर्षांमधील निवडणुकांच्या निकालांचते विश्लेषण केल्यास हे लक्षात येते की, युपीमध्ये सलग गेल्या दोन निवडणुकांत कोणत्याही पक्षाच्या 15% हून अधिक मतांचे ध्रुवीकरण झालेले नाही. 

14 वर्ष युपीमध्ये हंग असेंबली 
- 14 वर्ष उत्तर प्रदेशात हंग असेंबलीची स्थिती होती. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. पण युपीतील हे समिकरण 2007 पासून बदलले. तेव्हापासून आतापर्यंत युपीने स्पष्ट कौल दिला आहे. 

विजयाचे समीकरण : प्रत्येक जागा जिंकण्यासाठी हवी 25-30% मते 
- गेल्या चार निवडणुकींचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, प्रत्येक जागा जिंकण्यासाठी 25 ते 30% टक्के मते पाहिजे. 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा विधानसभा मतदार संघानुसार अभ्यास केल्यास भाजपला 328 जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळाल्याचे पाहायला मिळते. 
- 403 जागांपैकी 253 जागांवर भाजपला 40% मते मिळाली होती. 94 जागांवर 50% हून अधिक मते मिळाली होती. 

पराभवाचे समिकरण : 15% मते इतर पक्षाला मिळावी 
- लोकसभा निवडणुकीतील 40% पेक्षा अधिक जागांवर पराभव पाहावा लागला तर सत्तेच्या स्पर्धेतून भाजप बाहेर पडेल. भाजपची 15% मते इतर पक्षाकडे गेल्यास तसे होईल. 
- दोन विरोधी पक्ष एकक्ष झाले आणि भाजपची मते 10% टक्क्यांनी कमी झाल्यास भाजपला सत्ता स्थापण्यास अडचणी येतील. 
- 2014 च्या निवडणुकीनंतर एका वर्षाने बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला होता. भाजपला त्याआधीच्या निवडणुकीपेक्षा 3% कमी मते मिळाली होती. 

एका पाठोपाठ झालेल्या निवडणुकांत एकाच पक्षाला मिळतात सर्वाधिक मते 
- विश्लेषणानुसार जेव्हा केंद्रात आणि राज्यांत एकापाठोपाठ एक निवडणुका होतात तेव्हा 77% मतदार एकाच पक्षाला मतदान करतात. 
- 2002 मध्ये सपाने राज्यात निवडणुका जिंकल्या. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने सर्वाधिक 36 जागा जिंकल्या. 
- 2007 मध्ये बसपाने राज्यात विजय मिळवला. त्यावेळी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. 
- 2014 मध्ये मात्र असे झाले नाही. 2012 मध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या सपाला 2014 मध्ये यश मिळू शकले नाही. 
- 2014 मध्ये युपीत मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेल्या भाजपला आता यश मिळाले नाही तर तो भाजपचा मोठा पराभव असेल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...