आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: तिहेरी तलाकचा मुद्दा अन् 100 उपऱ्या उमेदवारांनी मोदींना दिल्या 325 जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक प्रचाराने अखिलेश यांचे विकास मॉडेल आणि बसप प्रमुखांच्या जातीय राजकारणाला सत्तेतून बाहेर फेकलेे. मोदी यांनी हे निवडणूक युद्ध म्हणजे अखिलेश विरुद्ध मायावती विरुद्ध मोदी बनवले. नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना देशविरोधी असे संबोधले. विरोधक फक्त यावर आपली बाजू मांडत राहिले. यात केंद्राची उज्ज्वला, पीक विमा योजना, जनधन योजना, तिहेरी तलाकवर अफाट मते आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या बाजूला पंजाबात मोदी, बादल कुटुंबाला वाचवू शकले नाहीत आणि काँग्रसने तेथे मोठा विजय मिळवला.
 
उत्तर प्रदेश: ‘अखिलेश विरुद्ध मोदी’ निवडणुकीने फायदा
 
भाजपने पहिल्यांदा बुंदेलखंडाच्या सर्व १९ जागा जिंकल्या, पूर्वांचलच्या १७२ पैकी १३२ जागांवर आघाडी
 
१. ध्रुवीकरण: बसपा, मुस्लिम-दलित आणि सपाने मुस्लिम-यादव यांचे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे जिंकण्याचे समीकरण समजले. मायावती यांनी प्रत्येक सभेत सांगितले की, शंभर मुस्लिमांना तिकीट दिले जाईल. दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्ष सांगत राहिला की, मुस्लिम मतांसाठी काँग्रेसचे सहकार्य घेतले जाईल. 
 
भाजपनेे पुढारलेले, गैरयादव ओबीसी आणि दलित व्होट बँकेवर आपले लक्ष केंद्रित केले. १५० गैरयादव ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवले. पटेल, राजभर, कुर्मी यांचे राजकारण करणारे पक्ष , अपना दल आणि सुहेलदेव समाज पार्टीशी आघाडी केली. एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देता हिंदू मतदारांना संदेशच दिला. मोदी यांची कब्रस्तान-स्मशान ही घोषणाही या रणनीतीचा एक भाग होता. 
 
काय झाले: १०% हून अधिक दलित मते भाजपला मिळाली. ओबीसीची ३०% मते मिळाली.    
 
२. तिहेरी तलाक: भाजपने तिहेरी तलाकचा मुद्दा उपस्थित केला. सपा, बसप, काँग्रेस गप्प बसले. त्यांच्या गप्प बसण्यानेच मुस्लिम महिला भाजपकडे वळल्या. 
काय झाले: १५% मुस्लिम महिलांनी भाजपला मत दिले. मुस्लिमबहुल १२४ जागा (२० टक्के अधिक मुस्लिम) पैकी ९९ जागा भाजपला मिळाल्या.  
 
३. मोदींचा आक्रमक प्रचार: मोदी यांनी २१ जाहीर सभा घेतल्या. १३० जागांपर्यंत पोहोचले.
शेवटच्या टप्प्यात ३ दिवस काशीत होते. 
 
काँग्रेस : अमेठी-रायबरेलीत धुव्वा, ७ जागा भाजपला 
हे निकाल अगदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे आहेत. तेव्हा भाजप आघाडी ३२८ जागांवर आघाडीवर होती. यावेळी ३२५ जागा जिंकल्या. फरक फक्त इतकाच आहे की, काँग्रेस यावेळी अमेठी व रायबरेली हे बालेकिल्ले वाचवू शकली नाही. भाजपला १० पैकी ७ जागा मिळाल्या.
--------
पंजाब
आपने अकाली दलास सत्तेबाहेर काढले
१. पंजाबातील माळवा हा गुर्जर आणि दलितबहुल भाग आहे. ही अकाली दलाची व्होट बँक होती. त्यांनी मागच्या वेळेस येथील ६९ पैकी ३४ जागा जिंकल्या होत्या. परंतु येथे आपला भरघोस यश मिळाले. यावेळी आपला १८ जागा तर काँग्रेसला ४० जागा मिळाल्या. अकाली आघाडीला ९ जागांवर समाधान मानावे लागले.   
२. ड्रग्ज: येथे १० वर्षांपासून अकाली दल-भाजप सरकार होते. सत्ताविरोधी वातावरण होते. उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर अमली पदार्थ तस्करांना संरक्षण दिल्याचा आरोप होता. या आरोपांचा ते खुलासा करू शकले नाहीत. डेरा सच्चा सौदाचे ३५ लाखांहून अधिक समर्थक त्यांच्यापासून दूर गेले.
३ सिद्धूची साथ : सिद्धू काँग्रेससाठी किंगमेकर ठरले. त्यांनी भ्रष्टाचार आणि ड्रग्जचा मुद्दा ठासून मांडला.
 
उत्तराखंड
भाजपात एक तृतियांश आमदार ‘काँग्रेसी’ 
१.  मोदी विरुद्ध रावत: मोदी यांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध रावत अशी केली. मोदी स्वत:ला गरिबांचा तारणहार आणि रावत यांना भ्रष्टाचारी सिद्ध करण्यात यशस्वी झाले. रावत टिकू शकले नाहीत. 
-काँग्रेसचे १४ मोठे नेते भाजपात गेले. त्यामुळे पक्ष कमजोर झाला. प्रचारासाठीही नेता उरला नाही. 
-पक्षांतर्गत संघर्षाविरोधात रावत लढत होते. त्यामुळे सुरक्षित मतदारसंघ सोडून युद्धभूमीत उतरावे लागले.      
२. भाजपने दलित व्होटबँक जिंकली.दलित नेता अजय टम्टा यांना केंद्रीय मंत्री बनवले. काँग्रेसचे ज्येष्ठ दलित नेते यशपार्य आर्य आणि त्यांचे चिरंजीव संजीव आर्य भाजपात. 
 
निकाल: हरिद्वार जिल्ह्यातील दलित प्रभाव असलेल्या ११ जागा जिंकल्या. गढवाल क्षेत्रात ३८ जागा जिंकल्या.
 
गोवा
संघाच्या नाराजीने मुख्यमंत्री पराभूत
१. कमकुवत सीएम: मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पक्ष संघटना सांभाळू शकले नाहीत. सहयोगी पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सुदीन, दीपक ढवळीकर यांना कॅबिनेटमधून बाहेर काढले. त्याचबरोबर संघप्रचारक वेलिंगकर यांची बंडखोरी थोपवू शकले नाहीत. 
निकाल: संघाच्या एका गटाच्या विरोधामुळे स्वत:च हरले. सहयोगी पक्ष गेल्यामुळे पक्ष कमकुवत झाला. 
२. पर्रिकर यांची उणीव: पर्रिकर यांना केंद्रात बोलावल्याने गोवा भाजप कमकुवत झाला. पर्रिकर यांचे संघटना, संघ आणि सहयोगी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याचे धोरण होते. 
निकाल: पक्षाला बहुमताहून ७ कमी म्हणजे १४ जागा मिळाल्या. काँग्रेस मोठा पक्ष ठरला.
 
मणिपूर
काँग्रेसच्या मैतयी-कूकी मतात भाजपने पाडली फूट
- भाजपने काँग्रेसच्या कूकी आणि नागा जातीच्या नेत्यांना फोडले. पहाडी क्षेत्रात कूकी समाजाचा १०-१२ जागांवर प्रभाव आहे. २० जागांवर नागा मतदार प्रभाव टाकतात. भाजपने त्यांना आपल्या बाजूला वळवले.  
- राज्याच्या ३१ लाख लोकसंख्येपैकी मैतयी समाजाचे ६३ टक्के लोक आहेत. ६० पैकी ४० जागांवर त्यांचा प्रभाव आहे. मुख्यमंत्री इबोबी या समाजात मोडतात. हा समुदाय आरएसएसचे हिंदुत्त्व मानतो. त्याचा भाजपला फायदा.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अनिवासी पंजाबींनी केला बादल सरकारविरोधात प्रचार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...