आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंतनागमध्ये महेबूब विरुद्ध महेबुबा यांची लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मूच्या कश्मिरमध्ये सर्वात रोमांचक लढत तीन जागांवर आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फ्रन्स, विरोधीपक्ष पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी मैदानात आहे. कश्मिरमध्ये अनंतनाग येथून नॅशनल कॉन्फ्रन्सचे विद्यमान खासदार डॉ. महेबूब बेग आणि पीडीपी अध्यक्षा महेबुबा मुफ्ती यांच्या लढत रंगणार आहे. अनंतनागमध्ये 24 एप्रिलला मतदान होणार आहे. जम्मू मध्ये भाजप आणि नॅशनल कॉन्फ्रंस आणि काँग्रेस आघाडीत लढत आहे. अनंतनागमधून महेबूब बेग गेल्यावेळीही विजयी झाले होते. केंद्रीय मंत्री गुनाम नबी आझाद यांना उधमपूर-डोडा मधून उमेदवारी देण्याबाबत शंका आहे. काँग्रेस हायकमांडला त्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करायचे नाही. आझाद यांनाही निवडणूक लढायची इच्छा नाही.