आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Andaman Forests Under Threat From Deer And Elephants

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरीण व हत्तींमुळे अंदमानचे जंगल संकटात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - अंदमान बेटावरील उष्णकटीबंधीय वर्षावनास इमारत लाकूड व्यावसायिक किंवा विकासकामांमुळे नव्हे, तर हरीण व हत्तीच्या उच्छादामुळे धोका निर्माण झाला असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे.

ब्रिटिशांनी 1930 मध्ये या ठिकाणी चितळ प्राण्याला आणले होते. शत्रूचा अभाव व पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या या प्राण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणशास्त्र संशोधक रऊफ अली यांनी तयार केलेल्या अहवालात हरिण व चितळामुळे गवत, झाड-झुडपांचा मोठ्या प्रमाणात नाश होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रानटी वराहाव्यतिरिक्त येथे मूळ शाकाहारी प्राणी नाही. संशोधकांनी महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, जारवा संरक्षित वनातील गवत, वनस्पतीतील नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेरियन इंडेक्स (एनडीव्हीआय) अभ्यासला.

ज्या ठिकाणी हरणांची संख्या जास्त आहे, तिथे वनजमीन घटली. तसेच हरिण आणि हत्ती असलेल्या भागात ही घट त्या प्रमाणात दिसून आली. दोन्ही प्राण्यांचे अस्तित्व नसलेल्या ठिकाणी गवत, झाडझुडपाची घट आढळून आली नाही, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हत्तींच्या उच्छादामुळे झाडाझुडपांचा मोठ्या प्रमाणात नाश होत आहे. हत्तींकडून झाडांची मोडतोड केली जाते. चितळ गवत खुडण्याचे काम करतात, त्यामुळे वनामध्ये त्याप्रमाणात गवत तयार होत नाही. ठरावीक कालावधीसाठी केलेल्या अभ्यासात वनात गवताचे नष्ट झालेले प्रमाण चिंताजनक आहे, असे अली यांनी सांगितले.

आक्रमक प्रजातीबाबत धोरण नाही
वनसंपत्ती अबाधित राखण्यासाठी जागतिक स्तरावरील उपाय योजने आवश्यक आहे. त्यासाठी वनाच्या आर्थिक व पर्यावरण -हासाला कारणीभूत ठरणारी प्राणी, प्रजाती बाहेर काढणे गरजेचे ठरले आहे. यासाठी धोरणात बदल करून शिकारीला परवानगी दिल्यास अंदमान व निकोबार प्रशासनाला महसूल जमा होईल.हत्तीशी भावनिक नाते असल्यामुळे त्या प्राणाला ठार मारणे अशक्य आहे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आक्रमक प्रजातीबाबत कोणतेही धोरण नसलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.