आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र होणार सौर, पवनऊर्जा केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - सौर ऊर्जा, पवन ऊर्जेचे देशातील पहिले केंद्र म्हणून आंध्र प्रदेशची नवी आेळख निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जेचा कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी चार वर्षांत राज्याला ही आेळख देण्याचा संकल्प केला आहे.

राज्याला ऊर्जेच्या पातळीवर स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला असून २०१९ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

५१५ कोटींचे कर्ज
सरकारला त्यासाठी बँकांकडून ५१५ कोटी रूपयांचे कर्ज देण्याची हमी मिळाली आहे. त्यावरील व्याजदर अतिशय लवचिक असेल.

प्रकल्प क्षमता
सौर ऊर्जेसाठी सरकारने आगामी चार वर्षांत ५ हजार मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पवन ऊर्जेसाठी ४ हजार मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

ग्रीन एनर्जी कॉरिडोर
ग्रीन एनर्जी कॉरिडोर अंतर्गत राज्याला १ हजार २८९ काेटींचा निधी मिळणार आहे. त्यात केंद्र सरकार आणि काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांचा देखील वाटा असेल.

सोलर पार्कसाठी कसोशीचे प्रयत्न
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ५१५ कोटी रुपयांच्या निधीबद्दल केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. राज्य सरकारने २५०० मेगावॉट वीज क्षमता असलेल्या सौर पार्कसाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. त्याशिवाय अनंतपूर, कडपा, कुर्नूल जिल्ह्यातही सौर ऊर्जा केंद्र उभारणार आहे.