आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन. चंद्राबाबू नायडू गुरुजींनी घेतला ननवीच्या विद्यार्थ्यांचा तास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयवाडा- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी अतुकुरू या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवले. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नसून एक समाजसेवक म्हणून तुम्हाला शिकवायला आलोय, असे या वेळी चंद्राबाबू म्हणाले. विद्यांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री या गावात आले होते.

पंचतंत्रातील गोष्ट त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितली. लोभाने काहीच साध्य होत नाही. त्यातून केवळ दु:ख मिळते. मात्र खरी मैत्री आयुष्यभर पुरते. पैसा येतो जातो मात्र खरे मैत्र निरंतर टिकून राहते. देवाने आपल्याला सर्व काही दिले आहे. मात्र, लोभ सोडणे महत्त्वाचे असल्याचे या वेळी बोलताना चंद्राबाबू म्हणाले. लोभी मनुष्य समस्यांमध्ये अडकतो. चंद्राबाबूंनी तपशिलाने मुलांना पंचतंत्रातील गोष्टीचे मर्म समजावून सांगितले.

वृत्तपत्रे वाचा: मुख्यमंत्री
विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रे नित्याने वाचली पाहिजेत. सोबतच चांगली पुस्तके वाचणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पंचतंत्रासारखी पुस्तके वाचल्याने तुम्ही सजग चांगले नागरिक बनू शकता. आपले सहायक सचिव ए. राजमौली याच शाळेत शिकले. त्यांनी परिश्रम घेतल्याने ते आज आयएएस झाल्याचे उदाहरणही चंद्राबाबूंनी या वेळी दिले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)