आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणचे मुख्यमंत्री नव्या बंगल्यात गेले राहायला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अडीच वर्षांनंतर गुरुवारी आपल्या नव्या सरकारी बंगल्यात राहायला गेले. त्यांनी या बंगल्याचे नाव प्रगती भवन असे ठेवले आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, एक लाख चौरस फुटापेक्षा जास्त मोठ्या आकाराच्या या बंगल्यात बुलेटप्रूफ बाथरूमसह अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत.
राव यांनी गुरुवारी गृहप्रवेश केला. त्याचबरोबर काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाने बंगल्यासाठी सामान्य माणसांच्या मेहनतीचे ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बरबाद केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार उत्तमकुमार रेड्डी म्हणाले की, जर जमिनीची किंमतही जोडली तर मुख्यमंत्र्यांचा नवा बंगला सुमारे १५० कोटी रुपयांचा आहे. त्यांनी आपल्या वास्तूसाठी लोकांचा पैसा वाया घालवला आहे.

राव हे आतापर्यंत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात बांधलेल्या मुख्यमंत्री कॅम्पमध्ये राहत होते. नव्या बंगल्यात जाण्याआधी त्यांनी संपूर्ण रीतिरिवाजानुसार आपल्या पत्नीसह गृहप्रवेशाची पूजा केली. मुहूर्तानुसार पूजा गुरुवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी सुरू झाली. यावेळी विविध धर्मांच्या प्रार्थनाही करण्यात आल्या.

या गृहप्रवेश सोहळ्याला तेलंगण आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल, तेलंगणाचे विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, मंत्री, कार्यकर्ते तसेच उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...