आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andhra Pradesh CM Chandrababu Naidu's Name In Alleged Cash For Vote Case

Cash For Vote : आणखी एक ऑडिओ टेप, आंध्रचे CM नायडू यांचे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचे नाव कॅश फॉर व्होट प्रकरणात समोर आले आहे. सोमवारी आंध्र प्रदेशच्या माध्यमांमध्ये एक ऑडिओ टेप चावण्यात येत आहे. त्यात नायडू विधान परिषदेच वोट देण्यासाठी आमदारांशी चर्चा करत असल्याचे स्पष्ट होते. नायडू हे आमदारांची काळजी घेण्याचे आश्वासन देत असल्याचेही या ध्वनीफितीतून समोर येत आहे. एक मिनिट 40 सेकंदांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये असलेला आवाज नायडू यांचा नसल्याचा दावा आंध्रप्रदेश सरकारने केला आहे. टीपीडीने असे म्हटले आहे की, हा प्रकार नायडू यांना बदनाम करण्याचा कट आहे. काही दिवसांपूर्वीच टीडीपीच्या एका आमदाराला कॅश फॉर वोट प्रकरणात अटक झाली आहे.

काँग्रेसने मागितला राजीनामा
कॅश फॉर वोट प्रकरणात नाव आल्यानंतर काँग्रेसने चंद्राबाबू यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. कांग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, नायडू यांच्यावर असलेले आरोप खरे असतील तर त्यांनी लगेचच राजीनामा द्यायला हवा. त्यांनी ट्वीटद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, 9 जूनला चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान ते या मुद्यावर स्पष्टीकरण देणार असल्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार पी प्रभाकर यांनी हे वृत्त फेटाळले आहे. हा एक कट असून सरकार याबाबत गांभीर्याने विचार करणार असल्याचे ते म्हणाले.

काय आहे ऑडियो टेपमध्ये...
एक मिनिट 40 सेकंदांच्या या ऑडियो टेपमध्ये एक व्यक्ती आमदाराशी फोनवर बोलत आहे, तुम्ही आणि माझ्या आमदारांमध्ये झालेले बोलणे मला ठाऊक आहे. तुमची काळजी घेतली जाईल आणि तुम्हाला दिलेली वचने पाळली जाईल. असे संभाषण त्यात आहे. स्थानिक माध्यमांनी असा दावा केला आहे की, आमदारांना आश्वासने देणारी व्यक्ती ही नायडू आहे. हे संभाषण तेलुगू आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. सुरुवातीला दोघे इंग्रजीत बोलतात, तर नंतर दोघे तेलुगूमध्ये बोलत आहेत.

टीडीपी आमदाराने केला होता दावा
या ऑडियो टेपपूर्वी अँटी करप्शन ब्युरोने एक ऑडियो-व्हिडियो टेप जारी केला होता. त्या टेपमध्ये टीडीपी आमदार रेड्डी त्यांच्या 'बॉस'चा हवाला देत होते. टेपमध्ये 'बाबू गुरु' म्हणून ते नायडूंचा हवाला देत होते. त्यांनी हाही दावा केला होता की, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना याच कामासाठी नियुक्त केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबाशी संबंधित टी न्यूजने सर्वात आधी ही ध्वनीफित जारी केली. यानंतर असा दावा करण्यात आला आहे की, कॅश फॉर व्होट प्रकरणात गेल्या रविवारी अटक झालेल्या टीडीपी आमदारांना नायडुंचा पाठिंबा होता. अँटी करप्शन ब्युरोने टीडीपीचे आमदार रेवानाथ रेड्डी यांना अॅलव्हीस स्टीफन्सन यांना लाच देताना रंगेहाथ अटक केली होती. मतासाठी पाच कोटींची डील ठरली होती, असे सांगतिले जात आहे. त्यापैकी 50 लाख दिले जात असताना त्यांना अटक करण्यात आली.