आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andhra Pradesh, Odisha May Hit Falin, High Aleart Declare

आंध्र प्रदेश, ओडिशाला फालीनचा तडाखा बसणार, हायअलर्ट जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर / हैदराबाद - समुद्रात कित्येक तास स्थिर राहिल्यानंतर फालीन चक्रीवादळाने गुरुवारी वेग घेतला. पुढच्या चोवीस तासांत हे वादळ आणखी वेग पकडण्याची शक्यता असून त्याचा फटका आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीला बसण्याची धोका आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत हे वादळ आंध्र, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे या चक्रीवादळामुळे समुद्रात दोन मीटर उंचीच्या अजस्त्र लाटा उसळण्याचा धोका आहे. दरम्यान ओडिशा व आंध्र प्रदेशमध्ये सागरी किना-यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.


ओडिशा आणि सीमावर्ती आंध्र प्रदेशात चक्रीवादळाच्या तयारीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्थोनी यांना पत्र लिहून लष्कराला सज्ज राहण्यास सांगावे, अशी विनंती केली आहे. सर्व जिल्ह्यांत दुर्गापूजेनिमित्त सरकारी कर्मचा-यांना दोन दिवसांची सुटी देण्यात आली होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातही स्वतंत्र तेलंगणाला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या वीज कर्मचा-यांनी त्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कृती समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.


ओडिशा, आंध्रात मोठ्या नुकसानीची शक्यता : दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेशात फालीन चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारने यासंदर्भात अ‍ॅलर्ट जारी केला आहे.
ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरांत 12 ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा सरकारने 20 जिल्ह्यांत अलर्ट जारी केला आहे. वादळामुळे संपर्क, वीजपुरवठा यंत्रणा तसेच रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे व रस्ते वाहतूक व्यवस्थेला त्याचा फटका बसण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.


आजपासून परिणाम जाणवणार
भुवनेश्वर येथील हवामान खात्याचे संचालक शरद साहू यांनी सांगितले की, सध्या हे चक्रीवादळ ओडिशाजवळ पारादीपपासून 800, कलिंगपट्टणमपासून 870, विशाखापट्टणमपासून 900 किलोमीटर अंतरावर केंद्रित आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत ताशी 175 ते 185 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने चक्रीवादळ पारादीप व कलंगपट्टणम दरम्यान गोपालपूर येथे धडकण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दिवसभर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.