आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Andhra's MP K Geetha Tests Positive For Swine Flu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंध्र प्रदेशातील खासदार के. गीता यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - लोकसभा सदस्य के. गीता यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.आंध्र प्रदेशातील आराकू येथील त्या खासदार आहेत. चार दिवसांपूर्वी ताप व छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. विविध चाचण्यांनंतर त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न झाल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी जे. सरोजिनी यांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना यश येत असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.