नवी दिल्ली - पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या LOC (लाइन ऑफ कंट्रोल) ला लागून असलेल्या भागांमघ्ये आज (सोमवारी) सलग पाचव्या दिवशीही फायरिंग केली. गुरुवारपासून पाकिस्तानच्या या कुरापती सुरू असून, या परिसरातील नागरिकांनी भीतीने गाव सोडून इतरत्र आसरा घेतला आहे. रविवारपर्यंत पाकिस्तानच्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला.
सीमेच्या पलिकडून पुंछच्या मेंढर सेक्टरच्या बालाकोट परिसरातील अनेक गावांना लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये 120 एमएम मोर्टारसह अनेक मोठ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. फायरिंगमुळे पुंछच्या सांदाकोट, बसूनी, बरूटी अशा गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मृतांमध्ये बहुतांश याच गावातील आहेत. सलग सुरू असलेल्या फायरिंगमुळे लोकांना गाव सोडून पळण्याची वेळ आली आहे. लष्करानेही स्थानिकांना गाव सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी रात्री उशीरापासूनच पाकिस्तानी रेंजर्सने अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
फायरिंगवर पाकिस्तान ने काय म्हटले?
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाने रविवारी पाकिस्तानचे हाय कमिश्नर अब्दुल बासित यांना दिली होती. दरम्यान, पाकिस्ताननेच भारतावर उलट आरोप केले करत याला भारतच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानने किती केले सीजफायरचे उल्लंघन ?
वर्ष | पाक बॉर्डर आणि एलओसीवर किती वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन | किती जवान शहीद झाले | किती सामान्य नागरिंकांचा मृत्यू झाला | कितने लोक प्रभावित झाले |
2015 (आजपर्यंत) | 200 वेळा | 17 | 15 | 7200 |
2014 | 430 बार | 41 | 26 | 2.08 लाख |
44 वर्षांतील सर्वांत मोठी फायरिंग
मागील वर्षांच्या ऑगस्टनंतर होत सातत्याने होत असलेल्या फायरिंगमुळे सीमेलगत असलेल्या अनेक गावातील 32 हजार नागरिकांनी आपले घर सोडून इतरत्र स्थायिक होणे उचित मानले. दरम्यान, 1971 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉर्डर आणि एलओसीवर फायरिंग केली जात आहे.
एलओसी म्हणजे काय?
लाइन ऑफ कंट्रोल' (एलओसी) म्हणजेच ताबारेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा यात फरक आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ तर एलओसीवर आर्मी तैनात असते. एलओसीच्याच आधारे काश्मिरचा भारत आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला हिस्सा वेगळा झालेला आहे. ही सीमा 700 किमी लांब आहे. 1972 च्या शिमला करारानुसार ती ठरवण्यात आली आहे. ही आंतरराष्ट्रीय सीमा नसली, तरी दोन्ही देशांनी सामंजस्यांनी ठरवली आहे. तरीदेखील ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. काश्मिरच्या पश्चिम व उत्तर भागातील या सीमेच्या पलीकडे पाकिस्तानात आझाद काश्मिर, गिलगिट आणि बलिस्तान हे भाग आहेत. एकूण काश्मिरच्या 35 टक्के हिस्सा या भागात आहे. तर ईशान्येकडील 25 टक्के हिस्सा अक्साइ चीन नावाने चीनच्या ताबात आहे.
12 वर्षांपूर्वी झाला होता शस्त्रसंधीचा करार
भारत-पाकिस्तानमध्ये वर्ष 2003 मध्ये शस्त्रसंधीचा करार झाला होता. त्या हे ठरले होते की दोन्ही देशांकडून एलओसीवर फायरिंग केली जाणार नाही. मात्र, या काळात पाकिस्तानाने हा करार अनेक वेळा तोडला. यापूर्वी 1949 मध्ये कराची कराची करारानंतर शस्त्रसंधी लागू झाली होती. त्याला 1972च्या शिमला कराराच्या वेळी एलओसीमध्ये बदलले गेले. पुढे वाजपेयी सरकारच्या काळात पुन्हा 2003 मध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती.
संरक्षण तज्ज्ञांचे मत...
संरक्षण तज्ज्ञ पीएन हून म्हणाले, ''मला वाटते आता प्रतिहल्ला करण्याचे धोरण अवलंबायला हवे. या फायरिंगमध्ये मारल्या गेलेल्या गावकऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालय जबाबदार असल्याचे मी मानतो. त्यांच्याकडे याबाबत काहीच नियोजन कसे नाही ?''
लष्करानेही दिला इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फायरिंगपासून संरक्षण व्हावे यासाठी गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना दिली आहे. एक स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार लष्कराने बालकोटाच्या अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे.
मृतदेह उचलायलाही कुणी बाहेर येईना
पाकिस्तानकडून सलग होत असलेल्या फायरिंगमुळे लोक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. एका रहिवाशाने सांगितले, ''सीमेवर झालेल्या फायरिंगमध्ये लोक मारले जात आहेत. एवढे भीतीचे वातावरण आहे की, घराबाहेर पडलेले मृतदेह उचलण्यासाठीही कुणी बाहेर यायला धजावत नाही.''
पुढील स्लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...