आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angry Party Workers Agitated In Front Of BJP & JDU Office

बिहार : तिकिट कापल्याने भडकले JDU-BJP चे उमेदवार, केली तोडफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेडीयूच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते. - Divya Marathi
जेडीयूच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते.
पाटणा - तिकिट कापल्याने नाराज असलेल्या भाजप आणि जेडीयू कार्यकर्त्यांनी बुधवारी चांगलाच गदारोळ केला. भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयात चांगलीच तोडफोड केला. काहींनीतर कपडे काढून आंदोलनही केले. तर जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर धरणे दिले तसेच घोषणाबाजीही केली. जेडीयू कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थितीवर नियंत्रण मिळवले.

प्रकरण काय ?
मंगळवारी सायंकाळी भाजपच्या उमेदवारांची अखेरची यादी समोर आली. तर महाआघाडीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वीर चंद्र पटेल पथवर जवळ जवळच असलेल्या भाजप आणि जेडीयूच्या कार्यालयात पोहोचले.

भाजप कार्यालयात काय झाले?
रागावलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मेनगेटचे कुलूप तोडले. त्यानंतर कार्यालयात घुसून फर्निचरची तोडफोड केली. नाराज कार्यकर्ते कार्यालयासमोरच जमलेले आहेत. वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाने झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे. पार्टीने कैलाशपती मिश्र यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या सुनेला तिकिट नाकारले. हे कधीही सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले.

जेडीयू कार्यालयासमोर धरणे...
नितीश कुमार यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर रागावलेल्या जेडीयू कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photos...