आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात जनावरांचा ऑनलाइन बाजार; पशुपालकांची पायपीट वाचली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर- राजस्थानात आता जनावरांची खरेदी व विक्री जनावरांच्या बाजारात जाऊन करण्याऐवजी किंवा विविध राज्यांत जाऊन, तसेच गावागावांत जाऊन करण्याची गरज पडणार नाही. चांगल्या जातीच्या गाई व म्हशी तसेच बैलांच्या खरेदीसाठी व इतर माहितीसाठी राज्याच्या पशुपालन, डेअरी व मत्स्यपालन विभागाने ई- पशुहाट नावाची वेबसाइट सुरू केली आहे. ही एक देशी वेबसाइट असून यावर स्वत: पशुपालक त्यांच्या जनावरांची विक्री करण्यासाठीची माहिती देऊ शकतात. यावर जनावरांच्या किमतीही टाकल्या जाऊ शकतील. तसेच येथे आपल्या आवडीची जनावरे विकत घेता येतील.  


या वेबसाइटमुळे पशुपालकांना चांगल्या जातीची जनावरे शोधण्यासाठी वणवण भटकण्याची गरज पडणार नाही. त्या त्या भागातील जनावरांची माहिती या वेबसाइटवर असणार आहे. त्याच बरोबर सर्वात मोठा फायदा म्हणजे दलालांची मध्यस्थी संपुष्टात येणार आहे. त्यांना देण्यात येणारे तगडे कमिशनही वाचेल.  आजवर जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना व  पशुपालकांना गावोगावी किंवा राज्यातील जनावराच्या बाजारात जाऊन उत्तम जातीच्या जनावरांचा शोध घ्यावा लागत हाेता.  


आता सरकारकडून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे  उत्तम जातीच्या जनावरांसाठी पशुपालकांना आपला वेळ वाया घालवण्याचे व त्यासाठी लागणारे परिश्रमही वाचतील.  

 

जनावरांची विस्तृत माहिती
या ऑनलाइन पोर्टलवर जनावरांच्या जाती, त्यांचे वय, ब्रीडसह इतर लहानसहान माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर  पशुपालक आपली माहिती देत आहेत. यात मोबाइल क्रमांक व त्यांचे ठिकाण देण्यात आले. पशुपालकांनी दलालांच्या विळख्यात जाण्याऐवजी आता स्वत:च सौदाही करू लागले आहेत. या व्यवहारात त्यांचाच फायदा होणार आहे व त्यांचा वेळही वाचणार आहे. तसेच पशुपालक येथे अंड्यांचीही विक्री करत आहेत. केंद्रीय पशू नोंदणी योजनेचे सहायक रजिस्ट्रार बलबीर गैना यांनी सांगितले, अजमेरमध्ये आपण अनेक पशुपालक विभागाद्वारे  जनावरांची माहिती वेबसाइटवर शेअर केली होती. तसेच याद्वारे अनेकांनी  जनावरांची खरेदी व विक्रीही केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...