आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मर्दानीने झाशीच्या राणीसाठी दिले होते प्राण; वाचा कोण होती झलकारी बाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका: द क्वीन्स ऑफ झांसी' या सिनेमात झलकारी बाई यांचा रोल करत आहे. - Divya Marathi
अभिनेत्री अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका: द क्वीन्स ऑफ झांसी' या सिनेमात झलकारी बाई यांचा रोल करत आहे.
झाशी- टीव्‍‍ही शो 'पवित्र रिश्‍ता'फेम अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्‍ये पर्दापण करत आहे. सिनेमाचे नाव आहे 'मणिकर्णिका: द क्वीन्स ऑफ झांसी'. यामध्‍ये ती झाशीच्‍या राणीसारखीच दिसणारी विरांगणा झलकारी बाई यांची भूमिका साकारत आहे. सिनेमाची शूटिंगही सुरु झाली आहे. 19 नोव्‍हेंबररोजी लक्ष्‍मीबाई यांची बर्थ अॅनिर्व्‍हसरी आहे. यानिमित्‍त आम्‍ही ज्‍या योद्धेचा चेहरा झाशीच्‍या राणीशी अतिशय मिळता जुळता होता अशा इलकारी बाईबद्दल माहिती देत आहोत.


झाशीची राणी आणि झलकारी बाई यांची अशी झाली पहिली भेट
- इतिहासकार जानकी शरण वर्मा यांनी माहिती दिली आहे की, झलकारी बाई या राणी लक्ष्‍मीबाई यांच्‍या विश्‍वासू सैनिक होत्‍या. 22 नोव्‍हेंबर, 1830रोजी भोजला या गावी त्‍यांचा जन्‍म झाला होता. त्‍यांचे वडील हे मराठ्यांचे सैनिक होते. त्‍यामुळे लहानपणापासूनच  त्‍यांना शस्‍त्राशी खेळण्‍याची आवड होती.
- एकदा झलकारी यांच्‍या गावावर दरोडेखोरांनी हल्‍ला केला होता. तेव्‍हा झलकारी बाई यांनी गावक-यांसोबत मिळून दरोडेखोरांवर उलट हल्‍ला केला आणि दरोडोखो-यांना पळवून लावले होते. तेव्‍हा त्‍यांच्‍या या बहादुरीचा सर्वत्र डंका वाजला होता.
- झलकारी यांचा विवाह एका सैनिकाशी झाला होता. एकदा झलकारी बाई राणी लक्ष्‍मीबाई यांचे अभिनंदन करण्‍यासाठी मंदिरात गेल्‍या होत्‍या, तेव्‍हा त्‍यांना पाहून राणी लक्ष्‍मीबाई यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. कारण त्‍यांचा चेहरा राणीशी अगदी मिळताजुळता होता. त्‍यानंतर दोघींमध्‍येही चांगली मैत्री झाली होती.


असे आले हौतात्म्य
- 1857मध्‍ये झाशीच्‍या किल्‍ल्‍यावर इग्रंजानी हल्‍ला केला. राणीच्‍या सेनानायक इंग्रजांशी फितुर झाला होता. त्‍याच्‍या मदतीने किल्‍ल्‍यापर्यंत पोहोचण्‍यात इंग्रजांना यश आले.
- जेव्‍हा राणीला चोहोबाजुनी घेरण्‍यात आले तेव्‍हा झलकारी बाई त्‍यांना म्‍हणाली होती, 'तुम्‍ही सुरक्षित स्‍थळी पोहोचा, मी तुमच्‍या जागी लढते.' नंतर राणी लक्ष्‍मीबाई  किल्‍ल्‍याच्‍या बाहेर पडल्‍या आणि त्यांची वेशभुषा करुन राणी झलकारी बाई लढल्‍या.
- इंग्रज जनरल रोज याला यासंबंधीची सर्व माहिती कळाली तोपर्यंत राणी लक्ष्‍मीबाई किल्‍ल्‍यातून बाहेर जाण्‍यात यशस्‍वी झाल्‍या होत्‍या. नंतर झलकारी बाई यांना पकडण्‍यात आले. तेव्‍हा जनरल त्‍यांना म्‍हणाला, 'तु पागल आहेस. तुझ्यासारखेच हिंदुस्‍थानातील लोक पागल झाले तर आमचे येथे राहणे मुश्किल होऊन जाईल.'
- त्‍यानंतर झलकारी बाई यांना तोफेच्‍या तोंडी देऊन उडवण्‍यात आले होते.

 

राष्‍ट्र कवि मै‍थिली शरण यांनी झलकारी बाईंबद्दल लिहिले आहे...
जाकर रण में ललकारी थी,
वह तो झांसी की झलकारी थी,
गोरों से लड़ना सिखा गई,
है इतिहास में झलक रही,
वह भारत की ही नारी थी।

 

फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा...पुढील स्‍लाइडवर...

 

बातम्या आणखी आहेत...