आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानातील छावणीत निनावी पत्रके; जवानांच्या पत्नींना नाचण्याची सक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला (राजस्थान) - राजस्थानातील धर्मशाला छावणी भागात असलेल्या एका ब्रिगेडियर व त्यांच्या पत्नीवर जवानांशी वाईट वर्तन केल्याचा आरोप आहे. हे आरोप कोणी उघडपणे केलेले नाहीत. मात्र, निनावी पत्रके वृत्तपत्रांतून वाटण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही पत्रके वृत्तपत्रांतून फरसेटगंज येथील छावणी भागातील अधिकारी व अन्य लोकांच्या घरी पाेहोचली होती. या पत्रकातील मजकुरात म्हटले आहे की, येथील ब्रिगेडियरची पत्नी आम्हाला घरी बोलावून नाचण्यास सांगते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर जनरल दर्जाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही पत्रके कोणी छापली आणि वृत्तपत्र विक्रेत्यांकडे वाटण्यासाठी कोणी दिली याची चौकशी लष्करी गुप्तचर आणि केंद्रीय सुरक्षा संस्था करत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत यातील धागेदाेरे हाती लागलेले नव्हते. छावणीत असलेल्या अधिकाऱ्यांनीही यावर काही बोलण्यास नकार दिला.  


खोडसाळपणात अधिकारी की आयएसआय संस्था?  

प्राथमिक तपासात हे काम धर्मशाळा  मिलिटरी स्टेशनला कामावर असलेल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांचे असू शकते. त्यांच्या कामावरून ब्रिगेड कमांडर यांनी फटकारले होते.   या कृत्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय असू शकते, या दिशेनेही तपास सुरू आहे. 

 

पत्रकात म्हटले : रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नाही 

पत्रकात ब्रिगेडियर नवदीप बराड यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याच्या छायाचित्राखाली या व्यक्तीने आम्हाला खूप छळले आहे, अशी फोटोओळ लिहिली आहे. आमच्या व आमच्या कुटुंबांना घरी जेवणासाठी वेळ मिळत नाही.  तसेच झोपण्यासाठी वेळ मिळत नाही. आम्ही काम जर केले नाही तर तुम्हाला कधीही घर सोडावे लागते, असे सीओ यांनी सांगितले. कमांडरच्या पत्नी  महिलांना घरी बाेलावून घेतात. नाच करण्यास भाग पाडतात, असा आरोप पत्रकात केला आहे. येथील दवाखान्यात उपचार करावयाचे असल्यास पैसे द्यावे लागतात. कोणी आजारी पडल्यास योल येथील मिलिटरीच्या रुग्णालयात जाण्यासाठी वाहनांची सुविधा मिळत नाही. सीओ साहेब शिवीगाळ करतात. आमच्या घरात ना पाणी आहे ना वीज.  कमांडरच्या घरदुरुस्तीवर तब्बल ६० लाख रुपये खर्च  करण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...