आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात एका महिन्यात तिसरा स्फोट, फतेहाबादमध्ये बसमध्ये ब्लास्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद (भूना) - हरियाणामध्ये एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये तीन स्फोट झाले आहेत. यावेळी फतेहाबाद जिल्ह्यातील भूना येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता एका खासगी बसमधअये स्फोट झाला. त्यानंतर बसमध्ये आग लागली. या स्फोटात 15 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना भूना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांसह फॉरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाखल ते फतेहाबाद मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये हा स्फोट झाला. भूना येथून सकाळी 11 वाजता बस निघाली तेव्हा चालत्या बसमध्ये एक युवक चढला होता.
- बस फक्त अर्धा किलोमीटर चालली असेल तेव्हा त्यात स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली. तेव्हा बसमध्ये एकच गदारोळ झाला.
- काही प्रवाशांचे हात-पाय भाजले, जवळपास 15 लोक या स्फोटात जखमी झाले.
- जखमींपैकी एक दाम्पत्य गंभीर आहे. त्यांचे नाव बालादेवी आणि भूपसिंह असल्याचे समजते.
- स्फोटानंतर चालत्या बसमध्ये चढलेला युवक फरार झाला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
- घटनास्थळी फतेहाबादचे पोलिस अधीक्षक ओ.पी.नरवाल आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम पोहोचली आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स
शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...