आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओम पुरी यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात भारतीय सैनिकांचा अपमान केल्यावरून अभिनेता ओम पुरी यांच्याविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शंकर गोरा यांनी बुधवारी ही तक्रार दाखल केली, अशी माहिती सहायक उपनिरीक्षक सुभाष चांद यांनी दिली. ओम पुरी यांनी मानहानीकारक वक्तव्य करून जवानांचा अपमान केला अाहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत नमूद केले आहे. आम्ही या तक्रारीची चौकशी करत अाहोत, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे चांद यांनी सांगितले. महाराष्ट्रातही ओम पुरी यांच्याविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबरला तक्रार दाखल झाली होती. एका टीव्ही चॅनेलने पुरी यांना चर्चेसाठी बोलावले होते.

उरी हल्ल्यानंतर भारतीय चित्रपट, मालिकांत पाकिस्तानी कलावंतांवरील बंदी असा चर्चेचा विषय होता. या तक्रारीनुसार, ओम पुरी यांनी ‘सैनिकांना लष्करात जा, असे कोणी सांगितले होते? शस्त्रे उचला असे त्यांना कोणी सांगितले होते?’ असे प्रश्न उपस्थित केले होते.
बातम्या आणखी आहेत...