बदायूं/लखनऊ - प्रत्येक हिंदु महिलेने चार मुलांना जन्म देण्याचे आव्हान करणाफ्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आधीच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना साध्वी म्हणाल्या की, मी चार मुलांना जन्म द्या म्हटले होते, 40 पिल्लांना नव्हे.
जर 1400 वर्षांपूर्वी सर्व हिंदु होते तर, आझम खान, परवेझ मुशर्रफ, गिलानी आणि शाही इमाम बुखारी यांची घर वापसी करायला हवी. त्यांच्यासाठी घर वापसीची दारं खुली आहेत, असेही साध्वी यावेळी म्हणाल्या. बदायूं येथील मिशन कंपाऊंडमध्ये आयोजित विराट हिंदू कार्यकर्ता सम्मेलनात साध्वी प्राची यांनी ही प्रतिक्रिया दिली. साध्वी यांनी शाही इमामांना 'रेडा'म्हटले तसेच यूपीचे शिवपाल यादव यांना वेड्याच्या इस्पितळात पाठवण्याची गरज असल्याचेही म्हटले.
फोटो - विश्व हिंदू परिषद आणि भाजप नेत्या साध्वी प्राची यांचे संग्रहित छायाचित्र.
'मुली वाचवा, सुना घरी आणा'
साध्वी प्राची यांनी लव्ह जिहादवरही वक्तव्य केले. सध्या हिंदु मुलींनी फसवले जात आघे. त्यासाठी पैसाही पुरवला जातो. मी लव्हच्या नव्हे तर लव्ह जिहादच्या विरोधात आहे. त्यांनी कार्यर्त्यांना 'मुली वाचवा, सुना घरी आणा' असे आव्हान केले. त्याशिवाय काश्मीरमध्ये मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची फुटीरवादी नेते
युसूफ रझा गिलानी यांनी स्तुती केल्याचाही त्यांनी निषेध केला. साध्वी म्हणाल्या की, दहशतवाद्यांना शहीद म्हणणे लज्जास्पद आहे. कार्यक्रमाच्या अखेरीस साध्वी यांनी पाचपेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्यांचा सत्कारही केला.
भाजपने हात झटकले
भाजपने साध्वींच्या या वक्तव्यापासून हात झटकले आहेत. उत्तर प्रदेश बाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मिकांत वाजपेयी म्हणाले की, भाजप केवळ विकास आणि सुशासनावर वक्तव्य करते. या सर्वांनी भाजपला काही देणे घेणे नाही. अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करायचा नको असेही ते म्हणाले.
पुढे वाचा, काय म्हणाल्या साध्वी प्राची... बघा त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ...