आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Girl Gone Missing In Meerut, Parents Feared Forced Conversion

मेरठमध्ये आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याने तणाव, बळजबरी धर्मांतराची शंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - युपीच्या खरखौदा येथेही नुकताच एका महिलेच्या धर्म परिवर्तनाचा मुद्दा समोर आला आहे.

मेरठ - उत्‍तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यामध्ये एका तरुणीचे धर्मांतर आणि सामुहिक बलात्काराचे प्रकरण अजूनही निवळलेले नाही. अशातच आणखी एक तरुणी बेपत्ता झाल्याने पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या फलवाडा परिसरात एक हिंदु तरुणी बेपत्ता झाल्याने, धर्मांतरासाठी तिचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. ही तरुणी ज्या गावातील आहे, त्याच गावातील दोन भावांवर हा आरोप लावण्यात आला आहे.

परिसरात तणाव
हे प्रकरण समोर आल्यानंतर फलवाडा परिसरात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण ?
ही तरुणी मंगळवारी मोहम्मद फरजान नावाच्या प्रियकराबरोबर पळून गेल्याचे वृत्त होते. या मुलाचा भाऊही त्यादिवसापासून गावातून बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीला पळवून नेण्यात आले असून, तिचे धर्मांतर केले जाणार असल्याची शक्यता तरुणीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तसेच खरखौदासारखीच घटना घडण्याची भीतीही कुटुंबीयांना आहे. पोलिसांनी कुटुंबीयांची तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मात्र, नंतर एका मुस्लीम नेत्यांच्या विनंतीवरुन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपची निदर्शने
भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खटीक म्हणाले, आम्हाला मंगळवारी दुपारी या प्रकाराची माहिती मिळाली. त्यावेळी आम्ही पोलिसांना फरजान आणि त्याचा भाऊ इमरानच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची विनंती केली. या दोघांवर आधीपासूनच शंका होती, असेही ते म्हणाले.