आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा मृत्यू झाला तर अॅम्ब्यूलन्सने रस्त्यात उतरवून दिले, मृतदेह घेऊन 6 KM चालले वडील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकानगिरी (ओडीशा) - कालाहांडी येथील दाना मांझी यांनी पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याच्या घटनेला 10 दिवसही होत नाही तर, ओडिशामध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. 7 वर्षांच्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्यानंतर अॅम्ब्यूलन्स स्टाफने मृतदेहासाह त्यांना उतरवून दिले. यामुळे मुलीचा मृतदेह हातात घेऊन चालत घरी परतण्याची वेळ वडिलांवर आली.
- मलकानगिरी जिल्ह्यातील घुसापल्ली येथे शुक्रवारी 7 वर्षांची मुलगी वर्षा खेमुडुची प्रकृती बिघडली. कुटुंबीय अॅम्ब्यूलन्सने तिला जिल्हा हॉस्पिटलला घेऊन निघाले होते. रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला.
- मुलीचे वडील दीनबंधू खेमुडु यांनी सांगितले, 'मुलीचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर अॅम्ब्यूलन्स चालकांने आम्हाला उतरवून दिले. मुलीचा मृतदेह घेऊन मी पायी चालत घरी निघालो.'
- 6 किलोमीटर चालत एका गावात पोहोचलो. तेथील लोकांनी अधिकाऱ्यांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर आमच्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
- मलकानगिरीचे जिल्हाधिकारी के. सुदर्शन चक्रवर्ती यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी (CDMO) उदयशंकर मिश्रा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
- मिश्रांनी अॅम्ब्यूलन्स चालक, एक फार्मासिस्ट आणि एका सेवकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
- मिश्रा म्हणाले, 'अॅम्ब्यूलन्स चालकाने केलेले कृत्य हे अमानवीय आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही. चालकाने जे केले त्यासाठी त्याच्याविरोधात फौजादारी कारवाई केली जाईल. या घटनेसाठी जेवढे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल.'
- मिश्रा म्हणाले, मला या घटनेची ज्या क्षणाला माहिती मिळाली मी दुसऱ्या वाहनाची तत्काळ व्यवस्था केली. या वाहनाने कुटुंबाला घरी नेऊन सोडले.
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे दाना मांझीची कथा..
> पाहा VIDEO, मुलीचा मृतदेह हातावर घेऊन जाण्याची आली वडिलांवर वेळ
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...