आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Rape In Uttar Pradesh, 6 Policemen Suspended

यूपीमध्ये सामूहिक अत्याचार, सहा पोलिसांचे निलंबन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील बदायूं येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुझफ्फरनगर जिल्ह्यात आणखी एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दुर्लक्ष करणार्‍या सहा पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दुल्हेरा गावात एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचे उजेडात आले आहे. शाहपूर येथून दुल्हेरा गावाकडे जात असताना पाच जणांनी या महिलेचे अपहरण केले व तिच्यावर बळजबरी केली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 4 मे रोजी घडली. त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. न्याय मिळावा यासाठी गावकर्‍यांनी जोरदार आंदोलन केले. त्यामुळे पोलिस प्रशासनाला आपले गुडघे टेकावे लागले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक एच. एन. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची तक्रार घेण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल गावकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्या वेळी कामावर असलेल्या सहा पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.