आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेनला नेमके मारले कोणी? लादेनला मारल्याचा आणखी एका सील कमांडोचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - लादेनला मारल्याचा दावा केलेला रॉब
वॉशिंग्टन - श्रेयवाद लाटण्याचा प्रकार अमेरिकेतील सैन्यापर्यंत पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तेही ओसामा बिन लादेनला गोळ्या कोणी घातल्या याचे श्रेय लाटण्याचा हा वाद आहे. अमेरिकेच्या रॉब ओ निल याने आपण ओबामाच्या डोक्यात गोळ्या घालून त्याला ठार केल्याचे म्हटले होते. पण याच सील टीममधील आणखी एका सदस्याने रॉबच्या परस्परविरोधी वक्तव्य केले आहे. या दुस-या कमांडोच्या एका नीकटवर्तीय सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
रॉब ओनिल याच्या आधी लादेन असलेल्या खोलीत सीच कमांडोंच्या टीममधील इतर दोन सदस्यांनी प्रवेश केला होता. त्या दोघांमधील एकाने लादेनला गोळ्या घातल्या असल्याचे या सुत्राने सांगितले आहे. त्या कमांडोने स्वतः या सुत्राला त्याबाबत सांगितले आहे. या सर्व घटनेनंतर रॉबने खोली प्रवेश केला होता, असेही त्याने सांगतिले. या दोन कमांडोंमध्ये मॅट बिसनेट याचाही समावेश होता. मॅटने काही दिवसांपूर्वी या घटनेवर नो इझी डे नावाचे पुस्तक लिहिले आहे. पण त्या पुस्तकात लादेनला कोणी मारले याचा उल्लेख नाही.

एकाठिकाणी प्रतिक्रिया देताना गुरुवारी मॅट म्हणाला की, रॉब जे काही म्हणत असेल, ते त्याचे म्हणणे आहे. त्याबाबत मला काहीही बोलायचे नाही.