आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंगळुरू ब्‍लास्‍टप्रकरणी आणखी दोघे अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिशूर- बेंगळुरू येथील भारतीय जनता पक्षाच्‍या कार्यालयाबाहेर 17 एप्रिलला झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटाप्रकरणी कोईमतूरमधून दोघांना अटक करण्‍यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 22 वर्षीय सुल्फिकार अली आणि 24 वर्षीय सबीर यांना शनिवारी कुन्‍नाकूलम येथील एका कार्यालयाशेजारी अटक करण्‍यात आली. हे दोघेही सबीरच्‍या नातेवाईकाकडे उतरले होते. तेथूनच त्‍यांना ताब्‍यात घेण्‍यात आले.

अली आणि सबीरला कर्नाटक आणि तामिळनाडू पोलिसांच्‍या संयुक्‍त टीमने अटक केली. बेंगळुरूस्‍फोट प्रकरणी आता अटक करण्‍यात आलेल्‍यांची संख्‍या 13 वर पोहोचली आहे. भाजप कार्यालयाबाहेर झालेल्‍या ब्‍लास्‍टमध्‍ये 17 लोक जखमी झाले होते. यामध्‍ये 11 पोलिसांचा समावेश होता.