आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार टॉपर स्कॅम : उत्तरपत्रिकेत 300 वेळा तुलसीदास अन् 101 चित्रपटांची नावे लिहिली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार इंटर टॉपर्स घोटाळ्यातील आर्ट्सची टॉपर बनलेली रुबी रॉयची उत्तरपत्रिका समोर आली आहे. रुबीने तिच्या ओरिजनल उत्तरपत्रिकांमध्ये शायरी, 101 चित्रपटांची नावे आणि 300 वेळा तुलसीदासजी असे लिहिले असल्याचे समोर आले आहे. नंतर या उत्तरपत्रिका बदलण्यात आल्या होत्या. एक्सपर्ट्सने रूबीच्या दुसऱ्या उत्तरपत्रिका लिहिल्या होत्या. जून महिन्यात हा घोटाळा समोर आल्यानंतर हा निकाल रद्द करण्यात आला होता.

बिहारच्या टॉपर्स स्कॅमची इनसाइड स्टोरी..
- पोलिसांना मिळालेल्या एफएसएलच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
- रूबी रायने इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत हिंदीतही काही लिहिले होते हे समोर आले. परीक्षा हॉल मध्ये वेळ घालवण्यासाठी ती असे करायची.
- रुबी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या शाळेचे मालक आणि टॉपर्स स्कॅमचा मास्टरमाइंड बच्चा हा रूबीच्या वडिलांचा मित्र होता.
- त्यामुळे रुबीच्या वडिलांनी त्यांच्याकडे मुलीच्या परीक्षेसाठी मदत मागितली होती.
- त्यानंतर रुबीसह अनेक विद्यार्थ्यांच्या ओरिजनल उत्तरपत्रिकाबदलून विद्यार्थ्यांना टॉपर्स बनवण्यात आले.

लाखो रुपयांचे व्यवहार..
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात असे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत.
- एज्युकेशन माफिया, अधिकारी, नेते आणि नीकटवर्तीयांना टॉपर बनवले जाते. रुबीही त्यांच्यापैकीच एक होती.
- परिक्षेपू्र्वी अशा मुलांना निवडले जायचे. या कामासाठी कुटुंबीयांकडून लाखो रुपये घेतले जात होते.
- ही मुलेदेखिल सामान्य मुलांप्रमाणेच परीक्षा द्यायला जायचे.
- परीक्षेत ते पूर्ण 3 तासांचा वेळ द्यायचे. उत्तरपत्रिकेत काहीतरी लिहित राहायचे. त्यामुळे कोणाला शंका येत नव्हती.
- परीक्षेचा वेळ संपल्यानंतर शांतपणे उत्तरपत्रिका जमा करून निघून जायचे.

स्ट्राँग रूममध्ये बदलायचे उत्तरपत्रिका..
- परीक्षा हॉलमध्ये उपस्थित असलेले शिक्षक सर्व मुलांच्या उत्तरपत्रिका जमा करत होते.
- त्यानंतर शिक्षण माफिया स्ट्राँग रूममधून निवडक उत्तरपत्रिका काढून सोबत घेऊन जायचे.
- एखाद्या अज्ञात स्थळी जाऊन ते तज्ज्ञांकडून उत्तरपत्रिका लिहून घ्यायचे.
- एक तज्ज्ञ फळ्यावर उत्तरे लिहायचे आणि इतर लोक ते पाहून कॉपी करायचे.
- माफियांकडे आधीच बिहार शिक्षण मंडळाच्या कोऱ्या उत्तरपत्रिका असायच्या.
- सर्व उत्तरे लिहिल्यानंतर पुन्हा उत्तरपत्रिका स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जायच्या.

रुबी म्हणाली, टॉपर कशी बनले माहिती नाही..
- प्रकरण समोर आल्यानंतर एसआयटीच्या चौकशीत रुबी चांगलीच इमोशनल झाली होती.
- ती म्हणाली, साहेब मी गावाकडची आहे.. मला माहिती नाही टॉपर कशी बनले.
- किमान मला सेकंड क्लासमध्ये तरी पास करा अशी विनंतीही रुबीने केली.
- ती म्हणाली की, तिला फक्त पास व्हायचे होते, पण बच्चा राय यांनी तिला टॉपर बनवले.
- घोटाळा समोर आल्यानंतर आरोपी लालकेश्वर सिंग, त्यांची पत्नी आणि बच्चा रायसह अनेकांना अटक केली आहे.

रिव्ह्यू टेस्टमधे फेल झाली रुबी
- आर्ट्सची टॉपर असलेल्या रुबीने पॉलिटिकल सायन्सला प्रॉडिकल सायन्स म्हटले होते.
- रुबी रिव्ह्यू टेस्टमध्ये फेल झाली होती. त्यामुळे तिचा निकाल रद्द केला आहे.
- रूबीला रिव्ह्यू टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली. सध्या ती जामीनावर आहे.
पुढे वाचा, संपूर्ण स्कॅमबाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...