आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Antagarh Bypoll 2014 Candidate Who Stayed Put Says CMO Offered Anything

छत्तीसगड: उमेदवारी मागे घेण्यासाठी CM ची होती ऑफर- उमेदवाराचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री रमणसिंह - Divya Marathi
मुख्यमंत्री रमणसिंह
रायपूर - छत्तीसगडच्या अंतागड विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत एक नवा खुलासा झाला आहे. आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाचे (एपीआय) उमेदवार रुपधर पुडो यांनी मुख्यमंत्री रमनसिंह यांचे खासगी सचिव ओ.पी.गुप्ता यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. पुडो यांनी निवडणूक आयोगालाही याची तक्रार केली आहे.
काय आहे प्रकरण
रमणसिंह जोगी कुटुंबात सौदेबाजी?
छत्तीसगडच्या अंतागड विधानसभा पोटनिवडणुकीत सप्टेंबर 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार मंतूराम पवार यांनी अर्ज परत घेतल्याच्या संदर्भात एक ध्वनिफीत समोर आली आहे. मुख्यमंत्री रमणसिंह आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या कुटुंबात कथित सौदेबाजी झाल्यामुळे मंतूराम यांनी अर्ज परत घेतल्याचे त्यात म्हटले आहे.
एपीआय नेत्याच्या तक्रारीवर निवडणुक आयोग काय म्हणाले
- निवडणूक आयोगाने 7 जानेवारी पर्यंत छत्तीसगड प्रशासनाकडून याचे उत्तर मागितले आहे.
- एपीआय नेते पुडो यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार दिली आहे.
- एपीआय नेते पुडो यांच्या म्हणण्यानुसार, एक वर्ष होऊनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली.
- पुडो यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये बिलासपूर हायकोर्टातही याचिका दाखल केली होती.
- याआधी इंडियन एक्स्प्रेसने ऑडिओ टेपच्या हवाल्याने दावा केला होता, की उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेस उमेदवारासोबत सौदेबाजी झाली होती.
काय आहे पुडो यांचा आरोप
- ओ.पी.गुप्ता म्हणाले होते, की रमणसिंह यांचे हात मजबूत करण्यासाठी मी उमेदवारी मागे घेतली पाहिजे.
- गुप्ता म्हणाले होते, तुम्ही सांगाल तिथे मी मुख्यमंत्र्यांसोबत तुमची मिटींग करुन देतो.
- ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली होती त्यांच्यासोबत सौदेबाजी झाली होती.
- 30 ऑगस्ट 2014 मध्ये अंतागड पोट निवडणुकीत 13 पैकी 11 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली होती.

पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेसच्या अमित जोगींना नोटीस