आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅम्नेस्टीच्या कार्यक्रमात देशद्रोही घोषणा, आरोपींच्या अटकेसाठी तीव्र निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या कार्यक्रमात भारत तसेच लष्कराविरोधात घोषणाबाजीची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राजभवनासमोर जोरदार निदर्शने केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी अॅम्नेस्टीविरोधात गुन्हे दाखल करून काही आरोपींना अटक केली आहे. भाजपचे खासदार प्रताप सिन्हा यांनी पोलिसांवर कारवाईत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिस आरोपींची ओळख पटवत आहेत. लवकरच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने शनिवारी काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघन या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात काही काश्मिरी कुटुंबांनाही बोलावले होते. काश्मीरमध्ये त्यांच्यावर कशा प्रकारचा अन्याय होतोय हे ते सांगणार होते. या वेळी काश्मिरी पंडितांचा एक गट तेथे आला. त्या दोन गटांत तीव्र वादावादी झाली. त्यावेळी काहीजणांनी भारत तसेच लष्कराविरुद्ध घोषणाबाजी करत काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावा, अशी मागणी केली. अभाविपने या कार्यक्रमाची सीडी देत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अॅम्नेस्टीने मात्र, घोषणा देणारे आमचे कर्मचारी नव्हते अशी सफाई देण्याचा प्रयत्न केला आहे.
बातम्या आणखी आहेत...