आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूच्या धर्तीवर आता पीयूमध्ये राष्ट्रविरोधी पोस्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाळा- दिल्लीच्या जवाहर नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) धर्तीवर पंजाबी विद्यापीठात (पीयू) मंगळवारी उघडपणे राष्ट्रविरोधी पोस्टर लावण्यात आले. या पोस्टर्सवर काश्मीरला स्वतंत्र करणे, फसवून काश्मीरवर ताबा मिळवणे, भारतीय लष्करावर दडपशाही करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोस्टरवर लिहिले की, भारताचे अखंडत्व काश्मीरच्या अत्याचारावर टिकले आहे. आम्हाला ही किंमत कदापिही मंजूर नाही.

पंजाब विद्यार्थी संघटना(ललकार) डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनकडून पीयूच्या आवारातील भिंतींवर ही पोस्टर्स लावण्यात आली होती. याशिवाय सर्व विद्यार्थ्यांना पाँप्लेट वाटप करण्यात आले. त्या सप्टेंबर रोजी पीयूमध्ये काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या रोष मार्चसाठी पीयू प्रशासनाकडून संघटनेने कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.

पीयूमध्ये राष्ट्रविरोधी पोस्टर लावल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाराज आहे.
बातम्या आणखी आहेत...