आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

J&K: कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा पोलिस पथकावर हल्ला, दोन जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सकाळी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. - Divya Marathi
शुक्रवारी सकाळी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. गोळीबारात दोन जवान शहीद झाले. दुसरीकडे बांदीपूरा येथे भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर येथे एक जवान शहीद झाला आहे.
बांदीपूर येथे दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार सुरक्षा बलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एन्काऊंटरमध्ये एक जवानही शहीद झाल्याची माहिती आहे. दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.

- बांदीपूरमध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली.
- त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. दरम्यान दहशतवाद्यांकडून जवानांवर फायरिंग करण्यात आली. त्यात एक जवान शहीद झाला.
- लष्कराच्या फायरिंगमध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

सोपोरमध्ये एन्काऊंटर सुरु
- वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॉर्थ काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हातील सोपार येथे तुज्जार शरीफ येथे सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
- येथे २२ राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांनी संयुक्त कारवाई केली आहे.
- सकाळी या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.
- लष्काराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे दोन दहशतवादी लपून असल्याचे म्हटले आहे.

गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी केला पोलिस स्टेशनवर हल्ला
- कुपवाडा जिल्ह्यातील कर्लगौंड येथे दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशनला लक्ष्य केले होते.
- पोलिसांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. यात जीवितहानीचे वृत्त नाही.
बातम्या आणखी आहेत...