आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये प्रथमच : बँक लूटणारा दहशतवादी झाकीर मुसावर लोकांनी केली दगडफेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरच्या त्रालमध्ये बँक लुटण्याच्या घटनेनंतर सिक्युरिटी फोर्सेस दहशतवाद्यांच्या शोधात आहे. - फाइल - Divya Marathi
काश्मीरच्या त्रालमध्ये बँक लुटण्याच्या घटनेनंतर सिक्युरिटी फोर्सेस दहशतवाद्यांच्या शोधात आहे. - फाइल

श्रीनगर/नवी दिल्ली - काश्मीरमध्ये प्रथमच स्थानिकांनी दहशतवाद्यांवर दगडफेक केली आहे. यात अल-कायदाच्या काश्मीर युनिटचा म्होरक्या झाकीर मुसाचाही समावेश होता. हे दहशतवादी त्रालच्या नूरपुरामध्ये एक बँक लुटण्यासाठी आले होते. स्थानिक लोकांनी जेव्हा दहशतवाद्यांवर दगडफेक केली केली तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर फायरिंग केले. पण तरीही दहशतवाद्यांना एक लाख रुपये लुटून फरार होण्यात यश आले. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेजही समोर आले आहे. 


बँकेत घुसले होते तीन दहशतवादी 
- सुरुवातीचा तपास आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार जाकीर मुसा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह बँक लुटण्यासाठी घुसला होता. दहशतवाद्यांनी 97 हजार रुपये लुटलेदेखिल. पोलिसांनी सांगितले की, या दहशतवाद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. त्राल जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात येते.  
- अवंतीपोराचे पोलिस अधीक्षक जाहीद मलिक यांच्या मते ही घटना सोमवारची आहे. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर बँक लिमिटेडच्या त्राल परिसरातील शाखेला लक्ष्य केले होते. 


मोस्ट वाँटेड आहे मुसा 
- अल-कायदाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. त्यात म्हटले होते की, त्यांनी झाकीर मुसाला काश्मीर युनिटचा चीफ घोषित केले आहे. या युनिलटला अन्सार घावातुल हिंद नाव दिले आहे. झाकीर मुसाला सिक्युरिटी फोर्सेस गेल्या काही काळापासून शोधत आहेत. मुसा यापूर्वी हिज्बुल मुजाहिदीनमध्ये होता. 


तीन दहशतवाद्यांनी परिधान केले होते मास्क 
- पोलिसांच्या मते, दहशतवादी सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बँकेत घुसले. सर्वांनी सर्वात आधी सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॅश काऊंटरवर ठेवलेले सुमारे एक लाख रुपये घेऊन लगेचच फरार झाले. तिन्ही दहशतवाद्यांनी मास्क परिधान केलेले होते. 
- पोलिसांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांबाबत काही पुरावे मिळाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. काश्मीरमध्ये गेल्या महिन्यातही एक बँक लुटण्याचा प्रयत्न झाला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...