आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीत अनुप्रिया ठरणार आव्हान, मंत्रिपदामुळे नितीशकुमारांची वाट बिकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अनुप्रिया पटेल यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातच नव्हे, तर उत्तर प्रदेशाबाहेर बिहारमधील राजकारणातही हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रीय राजकारणातील भूमिका घेण्यासाठी उत्सुक असलेल्या नितीशकुमार यांच्यासाठी मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया यांच्याकडे एक आव्हान म्हणून पाहिले जाते.
अनुप्रिया यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळण्यामागे उत्तर प्रदेश, विशेषत: पूर्वेकडील कुर्मी व्होटबँकेची रणनीती आहे, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. कुर्मी समुदायाची निवडणुकीच्या गणितात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे २०१७ च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीशही प्रयत्न करू लागले आहेत; परंतु त्यांची वाट सोपी नाही. वास्तविक नितीश व अनुप्रिया दोन्ही मागासवर्गातील कुर्मी समाजातील आहेत. गेल्या वर्षी जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष झाल्यानंतर बिहारच्या बाहेर समर्थकांची कक्षा वाढवण्यासाठी नितीश कुमार कुर्मी कार्ड खेळू लागले आहेत. त्या अंतर्गत उत्तर प्रदेशात वाराणसी, मिर्झापूर व गाझीपूरच्या कुर्मीबहुल भागात त्यांनी अनेक जाहीर सभा घेतल्या. अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर लोकसभा मतदारसंघात १७ जुलै रोजी त्यांची आणखी एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. हा प्रदेश कुर्मीबहुल म्हणून आेळखला जातो.

‘राजकारण नव्हे, सामाजिक न्यायाला महत्त्व’
अनुप्रिया यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे संयुक्त जनता दलाच्या भविष्यावर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. पक्ष जातीय राजकारणावर चालवला जात नाही. आम्ही सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पक्ष चालवतो, असे जदयूच्या उत्तर प्रदेश शाखेचे अध्यक्ष सुरेश नारायण यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांच्या सर्व सभा कुर्मीबहुल उत्तर प्रदेशात होणे हा केवळ योगायोग आहे, असा दावाही नारायण यांनी केला.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...