आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्‍या डॉ. कलाम यांच्‍या हेअर स्‍टाईलचे रहस्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्‍न डॉ. अब्दुल कलाम राष्‍ट्रपती झाल्‍यानंतर त्‍यांची हेअर स्‍टाईल चांगलीच चर्चेत आली होती. श्रीरामपूरमधील एका कार्यक्रमात त्‍यांनी आपल्‍या हेअर स्‍टाईलचे रहस्‍य उलगडले होते. ते म्‍हणाले होते, ' दहा वर्षांच्‍या कालावधित मी दीड कोटी तरूणांना भेटलो. त्‍यांच्‍याप्रमाणे आपल्‍याही डोक्‍यावर लांबलचक केस असायला हवे, असे मला वाटते. तेव्‍हापासूनच मला लांब केस आवडायला लागले.' अशा शब्‍दात त्‍यांनी तरूणांची मने जिंकली होती.
कॉपीची कॉपी
डॉ. कलाम म्‍हणत मी तरूणांची हेअर स्‍टाईल पाहून केस वाढवले आहेत. त्‍यानंतर काही तरूणांनी कलामांची हेअर स्‍टाईल पाहून केस वाढवले होते. अशा प्रकारे त्‍यांच्‍या हेअरस्‍टाईलच्‍या कॉपीची कॉपी झाली होती. पेशाने शिक्षक असलेले डॉ. कलाम यांना विद्यार्थ्‍यांना भेटून त्‍यांच्‍याशी गप्‍पा मारायला खुप आवडत असे. म्‍हणून ते तासनतास विद्यार्थ्‍यांमध्‍ये रमत असत. देशभरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्‍ये झालेली त्‍यांची व्‍याख्‍याने आज लोकप्रिय आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, डॉ. कलाम यांची हेअर स्‍टाईल..