आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • APJ Kalam Wanted To Resign As President In 2006 Says Ex Secy SM Khan

डॉ. कलाम देणार होते राष्‍ट्रपती पदाचा राजीनामा, माजी सचिवाचा गौप्‍यस्‍फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनी वर्ष 2006 मध्‍ये आपल्‍या राष्‍ट्रपतीपदाचा राजीनामा देण्‍याचा विचार केला होता, असा गौप्‍यस्‍फोट त्‍यांचे मीडिया सचिव एस. एम. खान यांनी शनिवारी केला. एसओए वि़द्यापीठात कलाम यांच्‍यावरील व्‍याख्‍यानात ते बोलत होते.
खान म्‍हणाले, '' 2006 मध्‍ये बिहार विधानसभा भंग करण्‍याचा प्रस्‍तावाला कलाम यांनी मंजुरी दिली होता. मात्र, त्‍यानंतर सर्वोच्‍च न्‍यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला. आपण घेतलेल्‍या या निर्णयामुळे मिसाइल मॅन कलाम लाजीरवाने झाले होते. त्‍यानंतर त्‍यांनी राजीनामा देण्‍याचा विचार केला होता.

नेमके काय झाले होते ?
- एस. एम. खान यांनी सांगितले की, त्‍यावेळी बिहारचे तत्‍कालीन राज्‍यपाल बुटा सिंह यांनी बिहार विधानसभा भंग करण्‍याची शिफारस केली होती. नंतर कॅबिनेटकडून हा प्रस्‍ताव कलाम यांच्‍याकडे आला.
- डॉ. कलाम हे त्‍यावेळी रशियाच्‍या दौऱ्यावर होते. त्‍यांनी कॅबिनेटच्‍या शिफारशीला मंजुरी दिली. पुढे सुप्रीम कोर्टाने विधानसभा भंग करण्‍याचा प्रस्‍ताव खारिज केला. त्‍याचे कलाम यांना वाईट वाटले. त्‍यांना आपल्‍या निर्णयाबद्दल लाजीरवाणे वाटले. आपली कुठे चूक झाली, याचा विचार त्‍यांनी केला.
- नंतर आपल्‍या राष्‍ट्रपतीपदाचा राजीनामा देण्‍याचा विचार त्‍यांनी केला होता. या बाबत आपल्‍या मोठ्या भावासोबत त्‍यांनी चर्चाही केली होती.
- आपल्‍या कुठल्‍याही निर्णयामुळे संविधानाला धोका निर्माण होऊ नये, असा निश्‍चय त्‍यांनी केला.