आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या शरीरावर आढळले 43 घाव, नराधमांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबाद - अपना दल (एस)च्या मंडळ अध्यक्ष आणि बीडीसी सदस्या संतोषी वर्मा आणि त्यांचे पती जितेंद्र पटेल यांची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. गुरुवारी दोन डॉक्टरांच्या पॅनले व्हिडिओग्राफी करून दोघांचे पोस्टमॉर्टम केले. महिलेच्या शरीरावर 24 घाव होते, तर तिच्या पतीच्या शरीरावर 19 घाव आढळले. रिपोर्टमध्ये आले आहे की बदमाशांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घातला होता. तथापि, अजून बलात्काराची माहिती मिळालेली नाही.
 
पोलिस स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर होते घर...
- गंगापारच्या बडगाव पोलिस चौकीपासून फक्त 300 मीटर अंतरावर जितेंद कुमार पटेल यांचे घर होते. ते भाजप समर्थित अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाशी जोडलेले होते.
- त्यांची पत्नी संतोषी वर्मा (40) बीडीसी मेंबर होत्या. मृत दांपत्याचा मोठा मुलगा राहुल इलाहाबादमध्ये शिकतोय, तर लहान मुलगा सोबतच राहायचा.
- बुधवारी रात्री लाइट नसल्याने जितेंद्र हे पत्नीसह घराबाहेर खाटेवर झोपले होते. सकाळी गावकऱ्यांनी पाहिले तर दोघेही रक्तबंबाळ होऊन पडलेले दिसले.
- घटनास्थळी एसएसपी आनंद कुलकर्णी यांनी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू, लोखंडी रॉड आणि वीट मिळाली. 
- घटनास्थळी 3 हून जास्त जणांच्या बोटांचे ठसे मिळाले आहेत. यावरून 3 हून जास्त खुनी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्री 12 ते पहाटे 4 दरम्यान हे खून झाले.
- सोरांवचे सीओ डी.पी. शुक्ला म्हणाले, दोघांचा निर्दयीपणे गळा कापण्यात आला आहे. पूर्ण शरीरावर अनेक घाव करण्यात आले आहेत.
 
मृताचा भाऊ म्हणतो...
- जितेंद्र यांचे मोठे भाऊ बनवारीलाल म्हणतात, हे प्रकरण राजकीय संघर्षाचे असू शकते. जितेंद्र आणि त्याची पत्नी संतोषी यांची कुणाशीही वैयक्तिक दुश्मनी नव्हती. संतोषी वर्मा सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. यामुळे अनेक राजकीय लोक खुन्नस ठेवून होते.
 
रेपचा खुलासा नाही
- दोन डॉक्टरांच्या पॅनलने मृतदेहाची व्हिडिओग्राफी करत पोस्टमॉर्टम केले. चेहरा, गळा आणि डोक्यावर डझनभर घाव आढळले.
- शरीराच्या इतर भागांवरही मारहाणीच्या खुणा होत्या. संतोषी वर्मावर रेपचा खुलासा होऊ शकला नाही.
 
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- इन्स्पेक्टर शर्मा म्हणाले, अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुन्यांबाबत अजून ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, एक जमिनीचा वाद समोर आला आहे, पण त्यात समझौता झाला होता. बाकी हत्येच्या मागची कहाणी तपासानंतर स्पष्ट होईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...