आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arms Act Case In Absance Of Record Hearing Postpon,Next Hearing On June First

काळविट शिकार प्रकरण : सलमान आर्म्स अॅक्ट अंतर्गत दोषी ठरण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बॉलिवूड स्टार सलमान खानला हिट अँड रन प्रकरणी मुंबईतील सेशन कोर्टात दोषी ठरविण्यात आले असून थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार आहे. याशिवाय जोधपूरमध्ये अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सलमानवर खटला चालू आहे. या प्रकरणात सोमवारी (4 मे) सलमानला तो निर्दोष असल्याचे सिद्ध करायचे होते. मात्र, कागदपत्रांच्या आभावी ही सुनावणी 1 जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
जोधपूर जिल्हा मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टात 29 एप्रिल रोजी सलमानाने स्वतः उपस्थित राहून त्याला फसवले जात असल्याचा युक्तिवाद केला होता. तो म्हणाला होता, या प्रकरणात वन अधिकारी मला फसवत आहेत. मी निर्दोष असल्याचे पुरावे सादर करण्याची मला संधी द्यावी. त्यासाठी पाच साक्षीदार कोर्टात हजर करण्याची परवानगी त्याने मागितली. मात्र कोर्टाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावला. कोर्टाच्या या निर्णयाला त्याने सेशन कोर्टात याचिका दाखल करुन आव्हान दिले आहे. त्यासाठी या प्रकरणाच्या सर्व फाइल्स सेशन कोर्टात पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे सोमवारची सुनावणी स्थगित करण्यात आली. आता याप्रकरणाची सुनावणी एक जून रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण
1998 मध्ये 'हम साथ-साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने जोधपूर जवळील तीन गावांमध्ये काळवीटांची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात सलमानचे नाव आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या रुमची तपासणी केली होती. त्यात पोलिसांना त्याच्या रुममधून एक रायफल आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केली होती. तपासात असे उघड झाले, की या शस्त्रांचा परवाना संपला होता. त्यामुळे सलमानविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय शिकारीच्या तीन पैकी दोन प्रकरणांमध्ये सलमानला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर कांकाणी हरणाच्या शिकार प्रकरणी अजून सुनावणी सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये, 29 एप्रिल रोजी जोधपूर कोर्टात हजर होण्यासाठी जात असताना सलमान