आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची याचिका कोर्टाने फेटाळली, आसाराम म्हणाले- सलमानकडून जादू शिकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- हिटअँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला दिलासा मिळाला असला तरी राजस्थानातील काळवीट शिकार प्रकरणाने त्याचा पिच्छा सोडलेला नाही. अवैध शस्त्र बाळगल्याच्या खटल्यात आपल्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या साक्षीदारांचे पुन्हा साक्षीजबाब घेण्यासाठी समन्स बजावण्याची विनंती करणारी सलमान खानची याचिका येथील न्यायालयाने फेटाळली आहे.

सलमानचे वकील एच. एम. सारस्वत म्हणाले की, कोणत्या कारणास्तव ही याचिका फेटाळण्यात आली, याविषयी न्यायालयाच्या ऑर्डरची आम्ही वाट पाहत आहोत. तसेच उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी सांगितले. सत्र न्यायाधीश मनोजकुमार व्यास यांनी गेल्या आठवड्यात याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली आणि निकाल राखून ठेवला.
तत्पूर्वी, सुनावणी होत असलेल्या न्यायालयाने सलमानची याचिका फेटाळली होती. यामुळे त्याच्या वकीलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सलमानच्या याचिकेत उल्लेख असलेल्या साक्षीदारांचे आधीच साक्षीजबाब घेण्यात आलेले आहेत. मुदतबाह्य परवान्याच्या शस्त्राने सलमानने जोधपूरमध्ये ऑक्टोबर १९९८ मध्ये दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सलमानकडून जादू शिकणार : आसाराम