श्रीनगर - काश्मिरी युवकांना कथित जवानांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी इशारा जारी केला आहे. इंडियन आर्मीचे लेफ्टनंट जनरल जे.एस. सांधू यांनी प्रोफेशनल वर्तन न करणाऱ्या जवानांवर कारवाई करणार असे ठणकावले आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवर व्हायरल होणाऱ्या कथित मारहाणीचा व्हिडिओ बनावट असल्याची सुद्धा चर्चा आहे.
- गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी युवकांना लष्करी जवान कथितरीत्या मारहाण करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी काहींमध्ये जवान असभ्य वागणूक करत असल्याचा सुद्धा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही व्हिडिओ बनावट सुद्धा आहेत.
- श्रीनगरमध्ये तैनात 15 कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सांधू यांनी या व्हिडिओंवर सवाल उपस्थित केला आहे. सैनिकांनी नेहमीच व्यावहारिक राहावे. योग्य वर्तन न करणाऱ्या जवानांवर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा सांधू यांनी दिला आहे. व्हायरल होणारे काही व्हिडिओ जुने आणि बनावट असल्याचे सुद्धा त्यांनी मान्य केले आहे.
- तरीही व्हिडिओंमध्ये दाखवलेले सत्य आढळून आल्यास किंवा कुठल्याही जवानांना गैरवर्तन केलेले सापडल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी ठणकावले आहे.