आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी पसरवल्या जाताहेत वेणी कापल्याच्या अफवा -लष्करप्रमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काश्मिरात वेणी कापल्याच्या वाढत्या तक्रारींवर शनिवारी आपली प्रतिक्रिया दिली. लोक लष्कर आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. इतर शहरांमध्येही असे प्रकार यापूर्वी घडले आहेत असे लष्करप्रमुखांनी सांगितले आहे. काश्मिर पोलिस आपले काम करत आहे. हळू-हळू सुरक्षा आणि सुव्यवस्था आटोक्यात येईल असेही ते पुढे म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, जम्मू आणि काश्मिरात वेणी कापल्याच्या आतापर्यंत 100 हून अधिक तक्रारी आणि त्यावरून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. याचाच बहाणा करत फुटिरतावाद्यांनी ठिक-ठिकाणी आंदोलने सुद्धा केली आहेत. 
 
काश्मिरच्या 7 परिसरांत कलम 144 लागू...
- एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठिक-ठिकाणी बंद पाळले जात असल्याने चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीनगरसह काश्मिरच्या 7 परिसरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे. 
- फुटिरतावादी नेता सय्यद अली शहा गिलानी, मीरवैझ उमर फारूख आणि मोहम्मद यासीन मलिकने बंदची हाक दिल्याने अनेक ठिकाणी सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच ठिकाणी शाळा, कॉलेज आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गाड्या बंद असल्याने प्रवाश्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- केवळ रस्ते वाहतूकच नव्हे, तर बंद आणि आंदोलनांमुळे रेल्वे यंत्रणा सुद्धा कोलमडली आहे. मध्य काश्मिरमध्ये श्रीनगर-बडगाम ते बारामुल्ला पर्यंत ट्रेन रद्द आहेत. 
- गेल्या 4 दिवसांपासून काश्मिरात वेणी कापल्याच्या अफवांवरून वादंग सुरू आहे. याच प्रकरणी एका संशयिताला तर चक्क जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. कित्येक ठिकाणी संशयितांना बुडून आणि रस्त्यावर मारहाण करून मारले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...