आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फील्ड मार्शल करिअप्पांना भारतरत्न द्या; लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनरल करिअप्पा यांनी दुसऱ्या महायुद्धाशिवाय 1947 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातही भारतीय लष्कराचे नेतृत्त्व केले होते. - Divya Marathi
जनरल करिअप्पा यांनी दुसऱ्या महायुद्धाशिवाय 1947 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातही भारतीय लष्कराचे नेतृत्त्व केले होते.
गोनीकोप्पल (कर्नाटक)- फील्ड मार्शल जनरल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्याची मागणी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली आहे. लष्करप्रमुख म्हणाले, ‘फील्ड मार्शल करिअप्पांचा भारतरत्नाने सन्मान करण्याची वेळ आली आहे. इतरांना हा सन्मान मिळत असेल तर करिअप्पांना त्यापासून डावलण्याचे काेणतेही कारण नाही. आम्ही प्राधान्यक्रमाच्या आधारे लवकरच या प्रकरणात लक्ष घालू.’ तत्पूर्वी, द फील्ड मार्शल करिअप्पा जनरल थिमैया फोरमशी निगडित कर्नल के.सी. सुबैय्या यांनी भारतरत्नसाठी करिअप्पांचे नावाची शिफारस करावी, अशी िवनंती केली. लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ जनरल करिअप्पांना २८ एप्रिल १९८६ फील्ड मार्शल रँक दिले होते.

करिअप्पानी केले भारत-PAK युद्धाचे नेतृत्त्व 
- जनरल करिअप्पा यांचा जन्म 1899 मध्ये झाला. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाबरोबरच 1947 मध्ये भारत पाकिस्तान युद्धातही भारतीय लष्कराचे नेतृत्त्व केले होते. त्यांना 1986 मध्ये फिल्ड मार्शल रँक देण्यात आला. त्यानंतर 6 वर्षांनंतर 1993 मध्ये बंगळुरूच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. 

मार्शल कधीही रिटायर होत नाहीत... 
- करिअप्पा फिल्ड मार्शल रँक मिळवणारे दुसरे लष्करी अधिकारी होते. त्यांच्याआधी सॅम मानेकशॉ यांना हा रँक मिळाला आहे. मार्शल कधीही निवृत्त होत नसतात. त्यांना 5 स्टार रँक मिळत असते. 
- भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये आतापर्यंत मार्शल रँक मिळवणारे तीन लष्करी अधिकारी होऊन गेले आहेत. दो फील्ड मार्शल शिवाय एअरफोर्समध्ये अजरन सिंह यांनाही 5 स्टार रँक मिळाले होते. गेल्या महिन्यातच त्यांचे निधन झाले. 
बातम्या आणखी आहेत...