आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Army Convoy Ambushed In Manipur\'s Chandel, 11 Dead, 16 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मणिपूरमध्ये लष्करावर हल्ला, २० जण शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ/ नवी दिल्ली - मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात गुरुवारी अतिरेक्यांनी लष्कराच्या ताफ्यावर घातक हल्ला चढवला. या हल्ल्यात किमान २० जवान शहीद, तर ११ जण जखमी झाले. शहिदांमध्ये एका जेसीओचा समावेश आहे. चार जखमींची प्रकृती गंभीर आहे.

इम्फाळपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावरील मोलटुक खो-यात हा हल्ला झाला. लष्कराच्या कारवाईत एक अतिरेकी मारला गेला, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल रोहन आनंद म्हणाले. ६- डोग्रा रेजिमेंटचे पथक गस्तीवर असताना पॅरॉलाँग आणि चराँग दरम्यान अतिरेक्यांनी हा हल्ला केला. अतिरेक्यांनी शक्तिशाली आयईडी स्फोट आणि ग्रेनेड डागल्याचे लष्कराने सांगितले. या ताफ्यात चार वाहने होती.

पीएलएवर संशय
हा हल्ला पीपल्स लिबरेशन आर्मीने कांगलेई यावोल कन्ना लुप नावाच्या संघटनेशी हातमिळवणी करून केला असावा, अशी शक्यता मणिपूरचे गृह सचिव जे. सुरेश बाबू यांनी व्यक्त केली. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटवरही शंका आहे .

दिल्लीत तातडीची बैठक
हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी दिल्लीत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व लष्करप्रमुखांची तातडीची बैठक घेतली. हा हल्ला भ्याडपणा आहे, असे ते म्हणाले. नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर. जेलियांग यांनी गृहमंत्री राजनाथ सिंहांशी चर्चा केली. एप्रिलमध्ये नागालँडमध्ये आसाम रायफल्सच्या ट्रक्सवर हल्ला झाला होता.

१३ वर्षांतील घातक अतिरेकी हल्ला
गेल्या १३ वर्षांतील लष्करावरील हा सर्वांत घातक हल्ला आहे. यापूर्वी मे २००२ मध्ये जम्मू- काश्मीरच्या कालुचकमध्ये लष्करी छावणीवरील हल्ल्यात ३१ जवान शहीद झाले होते. मागच्या महिन्यात त्रिपुरातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा मागे घेण्यात आला, अशावेळी हा हल्ला झाला.

शहिदाला सलाम : मोदी
हा हल्ला अत्यंत वेदनादायी आहे. हल्ल्यातील प्रत्येक शहिदाला माझा सलाम, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.