कोकराझार- स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांचा रेल्वे उडवण्याचा मोठा कट लष्कर आणि पोलिसांनी उधळून लावला. गुवाहाटी व कोकराझारदरम्यान रेल्वे ट्रॅकवर आयईडी (Improvised Explosive Device) लावण्याचा प्रयत्न करताना कमतापूर येथे लिब्रेशन ऑर्गनाइजेशनच्या एका दहशतवाद्याला लष्कर आणि पोलिसांनी कंठस्नान घातले.
पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुल, मॅग्झिन, जिंवत काडतुसे, दोन हॅंड ग्रेनेड आणि सात आयईडी व डेटोनेटर्स जप्त करण्यात आले आहे. याशिवाय जवानांनी ने सात किलो स्फोटके देखील जप्त केली आहेत.
आसाममधील गोपालपाडा- दुधनियादरम्यान गेल्या 27 फ्रेब्रुवारीला लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा असाच एक कट उधळला होता. रेल्वे ट्रॅकवर लावण्यात आलेले 10 किलो आयईडी निष्क्रिय करण्यात आले होते. या कटात युनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम या संघटनेचा हात होता. स्फोटकांमध्ये आरडीएक्स आणि टीएनटीचा वापर करण्यात आला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो..